हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॉमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra) त्याच्या कार्यक्रमात गाण्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) निशाणा साधला होता.. एकनाथ शिंदेंना गद्दार आणि ठाण्याचा रिक्षावाला म्हणून कुणाल कामराने टीका केली होती… या टीकेनंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत अंधरी येथील कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली… या संपूर्ण प्रकारानंतर महाराष्ट्रात खळबळ उडालीय.. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कुणाल कामरा यांचं समर्थन करत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस याना खडेबोल सुनावले आहेत.
प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी सर्वप्रथम जनतेला हे स्पष्ट करु इच्छितो की काल कामराच्या तिथे जी तोडफोड झाली त्याच्या शिवसेनेशी काहीही संबंध नाही. ते कदाचित गद्दार सेनेच्या गटाने केली असेल. सध्या जे राज्य चाललं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चाललं आहे की गद्दारांच्या आदर्शाने चाललं आहे, याचा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली आहे. हे गद्दार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर दिसत नाही, राहुल सोलापूरकर दिसत नाही. कोश्यारींनी अपमान केला तेव्हा त्यांचा विरोध करण्याचं धाडस यांच्यात नाही. त्यामुळे कुणाल कामराने काही अयोग्य केलं असं माझं मत नाही, त्याने जनभावना व्यक्त केली. जे सत्य आहे ती जनभावना त्याने मांडली आहे …. सत्य बोलणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला होऊ शकत नाही. हे सत्य आहे. आम्ही उघड बोलतोय हे गद्दार आहेत. उघड उघड चोरी केली त्यांचं काय असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कुणाल कामरा याना आपला पाठिंबा दर्शवला आहे…
कुणाल कामरा एकनाथ शिंदेंना नेमकं काय म्हणाला?
मुंबईतील ‘युनिकॉन्टिनेन्टल मुंबई’ या स्टुडिओमध्ये कुणाल कामराचा नुकताच स्टँड अप कॉमेडीचा शो पार पडला. हा शो काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास प्रसारित झाला. या शोमध्ये कुणालनं महाराष्ट्रातील गेल्या तीन वर्षातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी कुणाल कामरा यानं थेट एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. शिंदेंबाबत त्यानं ‘दिल तो पागल है’ सिनेमातील गाण्यावरुन वडंबनात्मक गाणं लिहिलं. या गाण्यामध्ये कुणाल कामरा यानं एकनाथ शिंदेंचा उल्लेख ठाण्याचा रिक्षावाला आणि गद्दार असा केला.आणि एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठवली…
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा
एक झलक दिखलाए कभी, गुवाहाटी में छिप जाये
मेरी नज़र से तुम देखो, गद्दार नज़र वो आए
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा… हाये…
मंत्री नहीं वो दलबदलू है, और कहा क्या जाये…?
जिस थाली में खाए, उसमें ही वो छेद कर जाए…
मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए
अशा आशयाचे हे गाणे होते… या गाण्यातील ठाण्याचा रिक्षावाला आणि गद्दार हे २ शब्द शिंदे गटाला चांगलेच झोंबले.. कुणाला कामराने एकनाथ शिंदेंना थेट टार्गेट केल्यानंतर शिंदे गट चांगलाच खवळला . शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामराच्या मुंबईतील स्टुडिओमध्ये धिंगाणा घातला . त्याच्या अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सेटची ४० ते ५० शिवसैनिकांनी तोडफोड केली. स्टुडिओतील खुर्च्या फेकल्या, बल्ब फोडण्यात आले.. या प्रकरणामध्ये 40 शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.