प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या महापालिका आणि इतर प्रश्नांवरुन भाजपकडून राज्य सरकावर निशाणा साधला जात आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून विरोधकांकडून केल्या जात असलेल्या प्रश्नांचा आणि टीकेचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. मुंबई महापालिकेत जरा कुठे खुट्ट झाले की लगेच महापालिकेला दुषणे दिली जातात. महापालिका काय करते? असा सवाल केला जातो. प्रश्नांचा भडिमार केला जातो. प्रश्न विचारणे सोपे असते. ते विचारायला अक्कल लागत नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.

आज मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी ते म्हणाले की, पहिल्यांदा मतं मागताना जी लोकं वाकलेली झुकलेली असतात ती लोकं मतं मिळाल्यावर ताठ होतात. राज्यावरची कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. कोरोनाच्या काळात मुंबई महापालिकेने खूप कामे केली. त्याचे कौतुक न्यूयॉर्कने आणि सर्वोच्च न्यायालयाने केले. आपण कौतुक करण्यासाठी काम करत नाही. कर्तव्य म्हणून काम करत असतो. उद्या कौतुक किती होईल त्याची अपेक्षा नाही. पण जरा कुठे खुट्टं झालं तर महापालिकेवर खापर फोडलं जातं.

अनेकवेळा विरोधकांकडून टीका केली जाते. प्रश्न विचारले जातात. नगरसेवक काय करतात? महापौर काय करतात? अशी दुषणं दिली जातात. आयुक्त काय करतात… हे काय करतात?… ते काय करतात..? हे सगळं ठिक आहे. पण तू काय करतो हे सांग? स्वत: काही करायचं नाही अन् प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला काही अकलेची गरज लागत नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

नाही तर तंत्रज्ञान फुकट जाईल – उद्धव ठाकरे

आपली महापालिका देशातील नंबर एकची महापालिका आहे. कोविडने आपली जीवनशैली बदलली आहे. गर्दी न करता वर्क फ्रॉम होम करायला लावलं आहे. आपला देश मोबाईल फोन वापरण्यात एक नंबर आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग सामान्यांना व्हायला पाहिजे. नाही तर तंत्रज्ञान फुकट जाईल. तंत्रज्ञानाचा जनतेसाठी उपयोग होतो ही चांगली गोष्ट आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हंटले.

Leave a Comment