“कोरोना काळातील कामाचे राज्यपालांकडून कौतुक मात्र विरोधकांडून भ्रष्टाचाराचे आरोप” ; मुख्यमंत्र्यांच्या कानपिचक्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई यथील अधिवेशनात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना घरे बांधून देणार असे जाहीर केले. त्यानंतर आज पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंनी सभागृहात भाषण केले. यावेळी कोरोना काळात केलेले कामावरून व राज्यपालांकडून केलेल्या कौतुकावरून विरोधकांना टोला लगावत त्यांना कानपिचक्याही दिल्या. राज्यातील महत्वाचे व्यक्ती असलेल्या राज्यपालांनीही महाराष्ट्रात कोरोना काळात जी कामे झाली त्याचे कौतुक केले. मात्र, विरोधकांनी कौतुक केले नाही. चांगल्या कामातही विरोधकांना भ्रष्टाचार दिसतो याचे दुर्दैव वाटते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हंटले.

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. यावेळी ते म्हणाले की, अधिवेशनात जेव्हा राज्यपाल सभागृहात आले तेव्हा त्यांना बोलूनही दिले गेले नाही. राज्यपाल काय बोलतात ते ऐकून घ्यायला हवं होतं. मात्र, तेही केले नाही. सुरुवातीपासूनच विरोधकांकडून सताधार्यांच्या कामावर टीका केली जात आहे. टीका करत आठवडाभर दाऊदचा मुद्दा काढला गेला. त्यांना आरशात पहिले तरी भ्रष्टाचार दिसत असणार असे वाटले.

कोरोना काळात हजारो किलोमीटर लांबून ऑक्सिजन आणायला लागत होता. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑक्सिजन एअरलिफ्ट करता येतो का? हे विचारलं. ऑक्सिजन ज्वलनशील असल्यानं एअरलिफ्ट करता येत नाही, मग रिकामे टँकर एअरलिफ्ट करण्यात आले. ही तिचं यंत्रणा आहे जी कोरोना काळात कार्यरत होती.
स्कॉटलंड येथील परिषदेत महाराष्ट्राचा सन्मान करण्यात आला. त्या ठिकाणी राज्यपालांनीही महाराष्ट्रातील कोरोना काळात केलेल्या कामांचे कौतुक केले. मात्र, आरसा बघितला तरी विरोधकांना भ्रष्टाचार झाला असा भ्रम होतो. आरसा बघितल्याशिवाय स्वत:चा चेहरा कसा आहे हे कसं कळणार? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारला.

Leave a Comment