वडिलांसोबत दोन्ही मुले प्रचाराच्या मैदानात! आदित्य कोल्हापूर तर तेजस ठाकरे संगमनेरमध्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतीनिधी। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महायुतीची सभा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर इथं होत आहे. उद्धव ठाकरे आज दुपारी हेलिकॉप्टरने सभास्थळी दाखल झाले. महत्त्वाचं म्हणजे संगमनेरमधील मंचावर महायुतीच्या बड्या नेत्यांसह एक चेहरा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता, तो म्हणजे उद्धव ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा.

तेजस ठाकरे हे सुद्धा महायुतीच्या आजच्या सभेला हजर राहिले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सभांच्या निमित्ताने आज कोल्हापुरात आहेत. गडहिंग्लजमध्ये त्यांची आज सभा आहे. आदित्य ठाकरे कोल्हापुरात, तेजस ठाकरे संगमनेरमध्ये असं आजचं चित्र पाहायला मिळालं. एकीकडे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सक्रीय राजकारणातून संसदीय राजकारणात उतरले आहेत. राज्यभर दौरा केल्यानंतर आदित्य ठाकरे आपण वरळीतून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. आदित्य ठाकरे यांनी माझ्यावर वरळीसह महाराष्ट्राची जबाबदारी असल्याचं म्हणत, राज्यभर प्रचाराला सुरुवात केली आहे.

एका बाजूने आदित्य तर दुसऱ्या बाजून उद्धव ठाकरे स्वत: प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. मात्र यावेळी उद्धव ठाकरेंच्या सोबतीला धाकटा चिरंजीव तेजस ठाकरे दिसत आहे. आदित्य ठाकरे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली, तेव्हा तेजस ठाकरेने स्वत: जाऊन आदित्यची गळाभेट घेतली. शिवसेनेच्या हल्लीच्या कार्यक्रमांना तेजस ठाकरेची हजेरी दिसत आहे. त्यामुळे तेजसचं ट्रेनिंग सुरु झालं की काय असा प्रश्न आहे.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment