मुंबई प्रतिनिधी | कोरोना रुग्णांच्या संख्येत गुणाकाराने वाढ व्हायला लागते ती वेळ आता सुरु झाली आहे. मात्र आपल्याला या गुणाकाराच्या वेळेत कोरोना रुग्णांची वजाबाकी करायची आहे असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण कोरोनाशी जंग सुरु केल्याची माहिती दिली आहे. तसेच गुणाकाराच्या संख्येने कोरोना रुग्ण वाढतात अशा वेळेत आपणाला वजाबाकीची रुग्णांची संख्या कमी करायची आहे. तेव्हा कृपया घरात रहा आणि विनाकारण बाहेर पडू नका असं आवाहनदेखील ठाकरे यांनी केले.
राज्यातील सर्व डाॅक्टर अतिशय धेैर्याने कोरोनाविरुद्ध लढत आहेत. मला आपल्या सर्व डाॅक्टरांचा अभिमान आहे. मीया सर्व डाॅक्टरांना मानाचा मुजरा करतो असं म्हणत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेवेवर असणार्या सर्व डाॅक्टरांचे कौतुक केले. मी रोज काही डाॅक्टरांशी फोनवर बोलतो. तेव्हा मी त्यांना विचारतो तुम्ही कसे आहात तर तेव्हा ते मलाच म्हणतात तुम्ही कसे आहात, काळजी घ्या. डाॅक्टरांशी बोलल्यावर माझं मनोधैर्य वाढतंय. रविवार असूनही सर्व डाॅक्टर, पोलिस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी तुमच्या आमच्या सर्वांसाठी अहोरात्र काम करत आहेत. तेव्हा त्या सर्वांना सहकार्य करा असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
दरम्यान, आता कदाचित निमोनियाचे रुग्ण वाढतील. माझी सर्व डाॅक्टरांना विनंती आहे की आपणाकडे निमोनियासदृश आजाराचे रुग्ण आले तर त्वरित त्यांचे X – Ray करा. कोरोना आजारावर प्राथमिक स्तरातच योग्य उपचार केले तर आपण कोरोनावर योग्यरित्या मात करु शकू. असंही ठाकरे म्हणालेत. तसेच, गरोदर माता, साठ वर्षांच्या वरील महिला व पुरुष, ज्यांना मधुमेह आहे या लोकांना अतिशय जबाबदारिने वागावे लागेल. अशा लोकांना त्यांच्या घरच्यांनी जपण्याची गरज आहे असं ठाकरे यांनी सांगितले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’
हे पण वाचा –
महाराष्ट्रात आढळले ७ नवे करोनाबाधित;संख्या १९३वर
भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?
भयावह! इटलीत २४ तासांत कोरोनाने घेतला ९००हून अधिक जणांचा बळी
बेजबाबदारपणाचा कळस; IAS अधिकारीचं होम क्वारंटाइनमधून पळाला
भारतात ‘या’ ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!
नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन