दिल्ली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मोदींच्या भेटीनंतर ठाकरे भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेणार असल्याचे समजत आहे. ठाकरे यांची अडवाणी भेट मास्टरस्ट्रोज असल्याचं बोललं जात आहे.
लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे पहिल्या फळीतील नेते असून शिवसेनेसोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत. अडवाणी अलीकडील काही काळात मुख्यप्रवाहापासून थोडे दूर गेले असल्याचे बोलले जात आहे. अशात मोदींच्या भेटीनंतर अडवाणींची भेट घेऊन ठाकरे अडवाणींना सन्मान देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अडवाणींची भेट ही शिवसेनेचा मास्टरस्टोक असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना आणि लालकृष्ण अडवाणी यांचे सुरवातीपासून चांगले संबंध होते. अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री सर्वज्ञात आहे. आता अशात उद्धव ठाकरे आणि अडवाणी यांच्या भेटीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.