उद्धव ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक, सावकारांकडे असलेलं कर्जही आता माफ होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकासआघाडीने एकापाठोपाठ एक कृतिशील योजनांचा धडाका लावला असून २ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची यशस्वी अंमलबजावणी केल्यानंतर सावकारी कर्जमाफीचा महत्वपूर्ण निर्णय आज उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

बांधावर जाणारा मुख्यमंत्री म्हणून ओळख निर्माण केलेल्या उद्धव ठाकरे यांनी सावकारी कर्जमाफीसाठी ६५ कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा आज केली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून याचा लाभ आता किती शेतकऱ्यांना मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

You might also like