‘जाणता राजा फक्त शिवाजी महाराजच’; उदयनराजेंनी साधला शरद पवारांवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । “शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष एकदाच जन्माला येतो. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. इतर कोणालाही ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो. फक्त एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, त्यांची प्रतिमा आपण देव्हाऱ्यात ठेवतो. आजही त्यांचं नाव काढलं की चैतन्य निर्माण होतं. प्रेरणा मिळते. अंगाला शहारा येतो. तुलना तर सोडाच, आपण त्यांच्या जवळपासही जाऊ शकत नाही,” असा टोला उदयनराजेंनी पवारांचे थेट नाव न घेता लगावला.

छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नरेंद्र मोदींशी करणाऱ्या ‘शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाश काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये पार पडले. यावरुन शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी शिवाजींच्या वंशजांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी आज (मंगळवारी) पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. या पुस्तकाच्या वादावरून राजकीय पक्षांकडून भाजपवर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना भाजपा नेते उदयनराजे भासले यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

Leave a Comment