Wednesday, February 8, 2023

ओपन जिम मध्ये कसरत करत उदयनराजेंनी दिले युवकांना व्यायामाचे धडे; साताऱ्यात विकासकामांचा धडाका सुरुच

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात विकासकामांचा धडाखा लावला आहे. साताऱ्यात नगरपालिका निवडणूक तोंडावर आली असून उदयनराजे यांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. याच दरम्यान, साताऱ्यातील फुटका तलाव येथील ओपन जिम चे उदघाटन करताना स्वतः मशीन वर व्यायाम करून युवकांना व्यायाम करण्याचा अनोखा संदेश दिला. उदयनराजे भोसले यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

- Advertisement -

साताऱ्यातील विविध विकासकामाचं उद्घाटन उदयनराजे यांच्या हस्ते होत आहे. उदयनराजे भोसले हे युवकांसाठी रोल मॉडेल आहेत. तरूणाई मध्ये राजेंची एक वेगळीच हवा आहे. साताऱ्यातील फुटका तलाव येथील ओपन जिमचे उदघाटन करताना स्वतः मशीन वर व्यायाम करुन उदयनराजे भोसले यांनी युवकांना व्यायाम करण्याचा अनोखा संदेश दिला.

दरम्यान, आगामी सातारा नगरपालिका निवडणुकीसाठी उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे या दोन्ही राजांनी कंबर कसली आहे. गतनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्या पॅनलने बाजी मारली होती. सातारा विकास आघाडीचे 22 नगरसेवक निवडून आले होते. तर, भाजपचे 6 नगरसेवक त्या निवडणुकीत विजयी झाले होते. नगरविकास आघाडीला 12 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा उदयनराजे भोसले बाजी मारणार का याकडे सातारकरांचे लक्ष आहे.