UGC चा मोठा निर्णय! आता एकाच वेळी घेता येणार दोन डिग्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता एकाच वेळी दोन वेगवेगळ्या शाखांमधील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात. विद्यापीठ अनुदान आयोगाने ( UGC) सशर्त मंजूरी दिली आहे.अलीकडेच झालेल्या एका बैठकीत UGC ने एकाच वेळी दोन डिग्रीच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांना या निर्णयामुळं दिलासा मिळणार आहे.

UGC चे सचिव रजनीश जैन यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘यूजीसीने हा निर्णय भारतीय विद्यार्थ्यांसाठी घेतला आहे. आता विद्यार्थी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या शाखांचे दोन भिन्न पदवी अभ्यासक्रम करू शकतात. दोन्ही पदवी पूर्णपणए वैध असतील. UGC सेक्रेटरींनी एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रमांच्या काही नियमांची माहिती दिली आहे. ही सुविधा फक्त महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी असेल असे त्यांनी म्हटले आहे.

 UGC चे उपाध्यक्ष भूषण पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने गेल्या वर्षी या विषयावर प्रस्ताव ठेवला होता. यापूर्वी २०१२ मध्ये अशी समिती स्थापन केली गेली होती. पण त्यावेळी या योजनेस मंजुरी मिळाली नव्हती.

तरच एकाच वेळी दोन डिग्री घेता येतील
जर तुम्ही एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम शिकत असाल तर त्यापैकी फक्त एकच पदवी नियमित स्वरूपात असेल. दुसरा अभ्यासक्रम तुम्हाला ऑनलाईन डिस्टन्स लर्निंग मोड (ओडीएल – ऑनलाईन डिस्टन्स लर्निंग) वर करावा लागेल. तुम्ही कोणत्या कोर्सचा अभ्यास करू इच्छित आहात हा पूर्णपणे तुमचा निर्णय असेल. या संदर्भातील सविस्तर मार्गदर्शक सूचना व नियमांची माहिती लवकरच अधिकृत अधिसूचनेसह प्रसिद्ध केली जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment