आता घरबसल्या आधार कार्ड रीप्रिंट करणे झाले सोपे, UIDAI ने दिली संपूर्ण माहिती; कसे करायचे ते घ्या जाणून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधार कार्डशिवाय बँक खाते, रेशन कार्ड अशा अनेक महत्वाच्या गोष्टी अडकल्या आहेत. खऱ्या अडचणी तेव्हाच वाढतात जेव्हा आपल्याला कळते की आपले आधार कार्ड एकतर हरवले आहे किंवा ते फाटलेले आहे. म्हणूनच आम्ही आपली ही समस्या सोडविण्यासाठी आपले आधार कार्ड पुन्हा प्रिंट कसे करायचे याची माहिती देत ​​आहोत. यूआयडीएआयने याबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. आपणास नवीन आधार कार्ड हवे असल्यास युआयडीएआयच्या वेबसाईटवर जाऊन नवीन प्रिंटसाठी ऑर्डर करावी लागेल. आतापर्यंत 60 लाख भारतीय नागरिकांनी या ‘ऑर्डर आधार रीप्रिंट सर्व्हिस’चा लाभ घेतल्याचे संघटनेने म्हटले आहे. त्यांच्या दाव्यानुसार 15 दिवसांच्या आत हे रिप्रिंटेड आधार कार्ड स्पीड पोस्टच्या माध्यमातून लोकांना देण्यात आली.

UIDAI ची वेबसाइट आणि mAadhaar अ‍ॅपद्वारे आपले आधार हे रीप्रिंट केले जाऊ शकतात. आपल्या आधारच्या रीप्रिंटसाठी अर्ज करण्यासाठी आधार कार्डधारकाकडे त्यांचा आधार क्रमांक किंवा व्हर्च्युअल आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच व्हीआयडी असणे आवश्यक आहे.

विशेष म्हणजे आपला मोबाइल नंबर जर आधारमध्ये रजिस्टर्ड नसला तरीही आपण आधार रीप्रिंट करू शकता. नॉन-रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर ओटीपी घेण्याचा ऑप्शन आहे.

हे लक्षात ठेवा की आधार रीप्रिंटसाठी आपल्याला 50 रुपये शुल्क भरावे लागेल. यात जीएसटी आणि स्पीड पोस्टच्या फीचा समावेश आहे. रीप्रिंटेड आधार लेटर स्पीड पोस्टच्या माध्यमातून आधार कार्डधारकाच्या रजिस्टर्ड पत्त्यावर 15 दिवसांच्या आत डिलिव्हर करण्यात येईल.

आधार रीप्रिंटची प्रक्रिया
येथे यूआयडीएआय वेबसाइटद्वारे आधार रीप्रिंटची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या …

सर्वात पहिले, आपण www.uidai.gov.in वरील ‘माय आधार सेक्शन’’ वर जा आणि ‘ऑर्डर आधार रीप्रिंट’ वर क्लिक करा.

यानंतर, आपल्याला उघडलेल्या पेजमध्ये आपला आधार क्रमांक किंवा व्हीआयडी आणि सिक्युरिटी कोड भरावा लागेल. तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड असल्यास ओटीपी पाठवा आणि क्लिक करा.

जर मोबाईल क्रमांक रजिस्टर्ड नसेल तर नॉन-रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकाच्या बॉक्समध्ये क्लिक करा आणि तो मोबाइल नंबर भरा. यानंतर, सेंड ओटीपी वर क्लिक करा.

आता मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी त्यामध्ये भरा आणि नियम व अटी वाचा आणि त्या बॉक्समध्ये टिक करा.
यानंतर आधार रीप्रिंटचा एक प्रिव्यू शो होईल. परंतु नॉन-रजिस्टर्ड मोबाइल नंबरधारकांसाठी हा प्रिव्यू शो उपलब्ध नाही.

प्रिव्यू मध्ये सर्व डिटेल्स तपासल्यानंतर,‘मेक पेमेंट’ वर क्लिक करा. आपण क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड / यूपीआय किंवा नेटबँकिंगच्या मदतीनेही पैसे देऊ शकता.

पैसे भरल्यानंतर पावती क्रमांक, एसआरएन, देयकाची तारीख आणि वेळ, टान्सझॅक्शन आयडी असे डिटेल्स डिस्प्ले केले जातील. एनरोलमेंट स्लिप डाउनलोड करण्याचा पर्यायही उपलब्ध असेल. आपण एसआरएन नंबर नोट केला पाहिजे.
प्रविष्ट केलेल्या मोबाइल नंबरवर एसआरएन डिटेल्ससह एक एसएमएस देखील येईल.

आपण स्टेटस देखील तपासू शकता
आपण आधार कार्डच्या रीप्रिंटसाठी अर्ज केल्यानंतर आपल्या अर्जाची स्थिती देखील तपासू शकता. ‘आधार रीप्रिंट स्टेटस’ हा पर्याय यूआयडीएआय वेबसाइटवर ‘माय आधार सेक्शन’ मधील ‘ऑर्डर आधार रीप्रिंट’ ऑप्शनच्या अगदी खाली उपलब्ध आहे.

यात थेट https://resident.uidai.gov.in/check-reprint-status द्वारे देखील प्रवेश केला जाऊ शकतो. आपल्या आधार रीप्रिंटचे स्टेटस तपासण्यासाठी निर्दिष्ट ठिकाणी एसआरएन, आधार क्रमांक आणि कॅप्चा प्रविष्ट करा आणि चेक स्टेटसवर क्लिक करा. यानंतर आधार रीप्रिंटचे स्टेटस समोर येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment