उजनी बॅकवॉटरला प्रदूषणाचा मोठा फटका; पाण्याला चढला दुर्गंधीयुक्त हिरवा तवंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर जिल्ह्यासाठी महत्वाचे वरदायिनी ठरलेले उजनी धरण यंदा जवळपास पूर्ण क्षमतेने भरले आहे. सोलापूर जिल्ह्यावर जरी पावसाची अवकृपा राहिली तरी देखील पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उजनी धरणाला मोठा फायदा झाला. यामुळे तब्बल दीड ते दोन वर्षांसाठी जिल्ह्याचा पाणी आणि सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. मात्र आता ह्याच धरणातील पाणी आरोग्यासाठी अपायकारक असल्याचे समोर आले आहे. भीमा नदीवरील आणि उजनी धरण बॅकवॉटरवर दुर्गंधीयुक्त हिरवट तवंग आल्याने हे पाणी आरोग्यास अपायकारक बनले आहे. एकेकाळी स्वच्छ, निर्मळ असलेल्या भीमा नदीचे सौंदर्य प्रदूषणाच्या फेºयात अडकले आहे. उजनी धरणमधील पाण्याला मानवनिर्मित प्रदूषणाच्या विळख्याने गटारगंगेचे स्वरूप आले आहे, हे धोकादायक असल्याचा सूर पर्यावरण तज्ज्ञांमधून व्यक्त होत आहे.

दरम्यान उजनी जलाशयात पुणे जिल्हा व परिसरातील वापरलेले, सांडपाणी तसेच औद्योगिक वसाहतीमधील खराब केमिकलयुक्त पाणी, कोणतीही प्रक्रिया न करता थेट येत असल्याने दूषित झालेले पाणी जलाशयामधून बहुतांश गावांत सार्वजनिक पाणीपुरवठा योजना अंतर्गत पिण्यासाठी उचलले जाते. यामुळे या पाण्यात असणाºया विविध जलचरांचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तसेच सबंध भीमा नदी पात्रात मासेमारी हा मोठा व्यवसाय चालतो. मासेमारीचा व्यवसाय करणाºयांना संकटांना तोंड द्यावे लागत आहे. भीमा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न केले जात नसल्याची खंत निसर्गप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment