विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर येणार बायोपिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । ‘ओह माय गॉड’ चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर बायोपिक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. उज्ज्वल निकम यांनी आजवर अनेक महत्त्वाचे खटले लढले असून त्यात यशही मिळवलं आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय उमेश शुक्ला यांनी घेतला आहे. या चित्रपटाचं नाव ‘निकम’ असं असून चित्रपटाच्या कथेचं लेखन भावेश मंडालिया आणि गौरव शुक्ला करणार आहेत.

“गेल्या कित्येक वर्षांपासून मी एखादं पुस्तक लिहावं किंवा माझा बायोपिक यावा अशी काहींची मागणी आहे. परंतु मला हे मान्य नाही. माझ्यावर बायोपिक यावा अशी माझी इच्छा नाही आणि तेवढा वेळही नाही. माझ्यावर अनेक खटल्यांच्या जबाबदाऱ्या आहेत. परंतु माझ्याकडे या चित्रपटाची टीम आली आणि त्यांची संकल्पना मला पटली. कदाचित या चित्रपटातून अशी एखादी कथा प्रेक्षकांसमोर सादर होईल की ज्यातून लोक प्रेरणा घेतील. त्यामुळे या बायोपिकसाठी मी तयार झालो”, असं उज्ज्वल निकम यांनी एका मुलाखतीत सांगितलं.आम्ही एका खऱ्या आयुष्यातील हिरोवर चित्रपट बनवत असल्याचा आम्हांला अधिक आनंद होत असल्याचं उमेश शुक्ला म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment