दिल्ली | जे.एन.यु. विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावर बंदुकीने जीवघेण हल्ला झाला आहे. दिल्ली येथील कन्स्टिट्युशनल क्लब येथे अज्ञातांनी खालिद याच्यावर आज गोळीबार केला. यामधे खालिद थोडक्यात वाचले असून त्यांना तातडीने दवाखाण्यात हलवण्यात आले आहे.
इतर महत्वाचे लेख –
शहीदाची बायको – प्रा. हरी नरके
क्या आप इंडिया का झंडा फाड दोगे ? पाकिस्तानात अजब युट्यूब प्रैक
हाती आलेल्या माहितीनुसार, दिल्ली येथील कन्स्टिट्युशनल क्लब या ठिकाणी अनेक सामाजिक कार्यकर्ता आणि विविध जनचळवळीचे नेते यांची बैठक भरली होती. यावेळी उमर खलिद ही या बैठकिस हजर राहण्यास गेले होते. दरम्यान सदर इमारतीबाहेर चहाच्या गाड्याजवळ एका अज्ञाताने खलिद यांना धक्का दिला आणि त्यानंतर खलिद याच्यावर गोळीबार केला. या जीवघेण्या हल्ल्यातून खलिद थोडक्यात वाचले. उपस्थितांनी गोळीबार करणार्यास पकडण्याचा प्रयत्न केला परंतू हवेत गोळीबार करुन अज्ञात आरोपी पळून जाण्यामधे यशस्वी झाला.
यापूर्वी उमर खालिद याला असे धमकीचे फोन आले होते. खालिद यांनी त्याबाबत त्या त्या वेळी पोलीसांना खबर करुन सुरक्षेसंदर्भात विचारले होते. रवि पुजारी नावाच्या फरार गुंडाने हे फोन केले असल्याचे त्याने फिर्यादित म्हटले होते. तसेच गुजरातेतील दलित नेता आणि आमदार जिग्नेश मेवानी यास सुद्धा रवि पुजारी नामक इसमाने फोन करुन धमकावले असल्याचे समोर येत आहे.
इतर महत्वाचे लेख –
युवकांनी राजकारणात येऊन संवैधानिक मूल्य लोकशाहीत रुजवावीत
सदर घटना दिल्लीतील गजबजलेल्या ठिकाणी घडली असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात असून दिल्ली पोलीस अधिकचा तपास करत आहेत.
Delhi: An unidentified man opened fire at JNU student Umar Khalid outside Constitution Club of India. He is unhurt. More details awaited. pic.twitter.com/ubNh4g4D80
— ANI (@ANI) August 13, 2018
Delhi Umar Khalid firing incident: Police register case against unknown persons under section 307 and under the Arms Act. Police says it has clues and the culprit will be arrested soon pic.twitter.com/o3s2TgN8O6
— ANI (@ANI) August 13, 2018