उमरगा विधानसभा मतदारसंघात ज्ञानराज चौगुले सलग चौथ्यांदा आमदार??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेनं साध्या सुध्या माणसांना राजकारणात आणलं…आमदार, खासदार, मंत्री केलं… धाराशिव जिल्ह्यातील उमरग्याबाबतही असंच काहीसं घडलं… पाहायला गेलं तर जिल्ह्यावर आधीपासूनच शिवसेनेचं वर्चस्व होतं… त्यात 2009 ला नव्यानं मतदारसंघ तयार झाल्यानंतर उमरगा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला… तेव्हा प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजेच लॅब असिस्टंट म्हणून नोकरी करणाऱ्या साध्या सुध्या, मध्यमवर्गीय ज्ञानराज चौगुले या माणसावर शिवसेनेने विश्वास टाकला… उमरग्याची उमेदवारी दिली… आणि आपल्या टाकलेल्या विश्वासावर अगदी सार्थ उतरत त्यांनी सलग तीन टर्म शिवसेनेचा भगवा मतदार संघावर फडकवत ठेवला… मात्र शिवसेनेच्या बंडात त्यांनी शिंदेंची वाट धरल्यानं प्रामाणिक शिवसैनिक त्यांच्यावर खवळलाय… पण यालाही पुरून उरत ज्ञानराज चौगुलेच सलग चौथ्यांदा उमरग्यातून आमदार होताना दिसतायत… फक्त ठाकरेंनी मनावर घेतलं तरच चौगुले यांचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो… येणाऱ्या विधानसभेला उमरग्यात नेमकं काय घडेल? निकाल कोणाच्या बाजूने लागेल?

उमरगा विधानसभा मतदार संघ हा १९९५ नंतर शिवसेनेचा बालेकिल्ला बनला… माजी खासदार रवींद्र गायकवाड व त्यांचे शिष्य विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले हे दोघेही इथून आमदार राहिले… रवींद्र गायकवाड खासदार झाल्यानंतर चौगुले आमदार बनले ते कायमचेच… 2014 आणि 2019 या दोन्ही टर्मला काँग्रेसच्या किसन कांबळेंचा पराभव करून चौघुलेंनी आपली आमदारकी कॉन्स्टंट ठेवली… गायकवाड बोले तैसे चौघुले चाले…. असं एकूणच चित्र असल्याने चौगुलेंच्या राजकारणाला मर्यादा होत्या… पण हळूहळू चौगुलेंनीही आपल्या कार्यकर्त्यांचा गट ॲक्टिव्ह करून स्वतःला राजकारणात खुल करून घेतलं…

YouTube video player

पण ज्या एका सामान्य नोकरदार माणसावर ठाकरेंनी विश्वास ठेवला…आमदार केलं… त्याच चौगुलेंनी शिवसेनेच्या फुटीत शिंदेंच्या बंडाला साथ दिली… अर्थातच ज्या फुटीर नेत्यांना मतदारसंघातील शिवसैनिकांना तोंड द्यावं लागतय… अगदी तशीच परिस्थिती उमरग्यातही आहे… सामान्य शिवसैनिक, निष्ठावान कार्यकर्ते आजही चौगुलेंच्या या भूमिकेवर नाराज आहेत… त्याचा फटका त्यांना येणाऱ्या काळात विधानसभेला बसू शकतो… त्यात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला मिळालेलं लीड पाहता ज्ञानराज चौगुले यांच्या आमदारकीचा चौकार हुकतोय की काय, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालीये… त्यामुळे महायुतीतील भाजपसोबत काँग्रेसमध्येही अनेक इच्छुकांनी विद्यमान आमदारांसोबत दोन हात करण्याची तयारी दाखवलीय… त्यात शिवसेना ठाकरे गटाकडून डॉ. संजय कांबळे यांच्या नावाची जोरात चर्चा आहे…

रिपब्लिकन पार्टी, भारिप बहुजन महासंघ असा त्यांचा राजकीय प्रवास असल्यामुळे येणाऱ्या काळात मतदार संघातील दलित व्होटबँक आपल्या बाजूने वळती करून घेण्यात त्यांना यश येऊ शकतं… सोबतच मुस्लिम समाजही मोठ्या प्रमाणावर असल्याने चौगुले यांना याचा लॉस होऊ शकतो… तब्बल 15 वर्ष आमदार असूनही पायाभूत सुविधा, रोजगार, औद्योगिक प्रकल्प, शिक्षण संस्था, एमआयडीसी अशा सगळ्याच पातळ्यांवर विद्यमान आमदार साहेब सपशेल फेल ठरले आहेत… अगदी उमरगा शहरात आठवड्यातून एकदा पाणी येत असेल तर मतदारसंघातील गाव खेड्यांवरची परिस्थिती कशी असेल? याचा विचार केला तरी अंगावर काटा येतो…

पण म्हणून ज्ञानराज चौगुलेंनी शिंदेंना साथ दिली त्यामुळे भावनिकतेच्या जोरावर इथं ठाकरे गटाला मतदान होईल, असही म्हणता येऊ शकत नाही… कारण चौगुले बंडा आधी तेरा वर्ष शिवसेनेचाच भाग होते… त्यामुळे जनता महायुतीला तर कंटाळली आहेच… पण सोबतच ठाकरेंच्या शिवसेनेलाही कंटाळली आहे… त्यामुळे उमरग्याची जनताच मुळात राजकारणाच्या बाबतीत उदासीन झाली आहे…हा सगळा पैशांचा खेळ असून यातून आपल्याला काही एक मिळत नाही, अशा प्रतिक्रिया मतदारसंघातील अनेक नागरिकांनी बोलून दाखवल्या… त्यामुळे महाविकास आघाडी कडून उमेदवारी कोणाला द्यायची? हे मोठं कोड असणार आहे… त्यात भाजपकडूनही कैलास शिंदे यांच्या आमदारकीच्या महत्वकांक्षा लपून राहिलेल्या नाहीयेत… त्यामुळे उमरग्यात आमदारकीचा चेहरा बदलणार, हे तर फिक्स आहे… पण त्या जागी नेमक्या कोणत्या चेहऱ्याला उमरग्याची जनता आमदार म्हणून पाहतेय? याची देखील क्लॅरिटी सध्या आलेली नाहीये…

पण ही राजकीय उदासीनता अशीच राहिली तर ज्ञानराज चौगुलेंना आपल्या सत्तेच्या चाव्या वापरून पुन्हा एकदा आमदारकीवर ठाण मांडून बसायला, फारसा वेळ लागणार नाही… मुस्लिम आणि दलित मतं या निवडणुकीत काय भूमिका घेतील? हीच एक गोष्ट उमरग्याचा आमदार ठरवणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांना याचा विचार करून उमेदवारी द्यावी लागणार आहे… बाकी तुम्हाला काय वाटतं? उमरग्यात ज्ञानराज चौगुले आमदारकीचा चौकार मारतील का? की महाविकास आघाडी त्यांना क्लीन बोल्ड करेल? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा…