Unbreakable Cricket Record : बाब्बो!! एका चेंडूत 286 धावा; क्रिकेटमधील कधीही न तुटणारा रेकॉर्ड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Unbreakable Cricket Record : क्रिकेट हा आपल्या भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ… क्रिकेटमध्ये नेहमीच नवनवीन रेकॉर्ड रचले जातात. सध्याच्या काळात T20 क्रिकेटमुळे तर खेळाचा हा प्रकार खूपच रोमांचक बनला आहे. त्यामुळे दररोज कोणता ना कोणता विक्रम तर तुटत असतोच मात्र क्रिकेट इतिहासात असा एक रेकॉर्ड आहे जो तोडणं मुश्किल ही नही नामूमकिन है असं म्हंटल जातंय. होय… हा रेकॉर्ड आहे एका चेंडूत 286 धावा करण्याचा… वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल आणि असं घडलं तरी कस असा प्रश्नही तुमच्या मनात पडला असेल. चला तर मग जाणून घेऊयात या क्रिकेट मधील या अनोख्या रेकॉर्डची रंजक कहाणी …..

क्रिकेटमधील हा कधीही न तुटणारा (Unbreakable Cricket Record) विक्रम 130 वर्षांपूर्वी रचला गेला आहे. 1894 मध्ये क्रिकेटच्या एका सामन्यात एका चेंडूत २८६ धावा काढण्यात आल्या. फलंदाजांनी एकही षटकार किंवा चौकार न मारता केवळ एका चेंडूवर २८६ धावा केल्या. त्यावेळी आजच्या सारखं सोशल मीडिया किंवा ऑनलाईन मीडिया नव्हती,. परंतु पाल मॉल गॅझेट या इंग्रजी वृत्तपत्रात हि बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या वृत्तपत्राचा अहवाल नंतर इतर अनेक देशांच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाला, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवता येईल.

काय होती ती घटना? Unbreakable Cricket Record

ही घटना १५ जानेवारी १८९४ रोजी घडली. पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये व्हिक्टोरिया आणि ‘स्क्रॅच-इलेव्हन’ या दोन संघांमध्ये हा सामना खेळला जात होता.बोनबरी मैदानावर खेळण्यात आलेल्या या सामन्यात व्हिक्टोरियाचे फलंदाज फलंदाजी करत होते. त्यावेळीफलंदाजाने चेंडू अशा प्रकारे मारला की तो शेतातील झाडात अडकला. यानंतर फलंदाज धावांसाठी खेळपट्टीवर धावू लागले. चेंडू खूप उंचावर अडकला होता आणि तो काढता आला नाही. फलंदाजांना धावा करण्यापासून रोखण्यासाठी विरोधी संघाने पंचांना चेंडू हरवलेला घोषित करण्याचे आवाहन केले. पण पंचांनी चेंडू सरळ दृष्टीक्षेपात असल्याचे सांगून अपील फेटाळले, त्यामुळे तो हरवला असे घोषित केले जाऊ शकत नाही. अनेक तासांनंतर रायफलने अचूक नेम साधत चेंडू झाडावरुन खाली पाडण्यात यश आलं. पण तोपर्यंत फलंदाजांनी तब्बल 286 धावा पळून काढल्या होत्या. रिपोर्टनुसार फलंदाज तब्बल 6 किलोमीटर धावले होते. त्यावेळी क्रिकेटमध्ये कोणतेही नियम नसल्याने हा रेकॉर्ड बनला, मात्र आजही या विक्रमाची आठवण काढली जाते.