IND vs Pak U19 WorldCup : पाकला धूळ चारत भारताचा फायनलमध्ये प्रवेश, युवा खेळाडूंची चमकदार कामगिरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : 19 वर्षाखालील आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत पाकिस्तानला धूळ चारली आणि फायनलमध्ये प्रवेश केला. भारताच्या या धडाकेबाज विजयानंतर भारताने 7 व्यांदा U19 World Cup च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे एकही गडी न गमावता भारताने हा विजय मिळविला आहे. सलामीवर यशस्वी जयस्वालने दमदार शतक झळकावले.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या भेदक आणि अचूक गोलंदाजी समोर पाकिस्तानला केवळ 172 धावा करता आल्या. पाकिस्तानने दिलेले हे लक्ष्य सलामीवीरांच्या जबरदस्त फलंदाजींवर भारताने सहज साध्य केले. सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि दिव्यांश सक्सेना यांच्या चमकदार कामगिरीच्या बळावर एकही गडी न गमावता भारताने हे लक्ष्य साध्य केले. 99 धावांवर असताना यशस्वी जयस्वालने विजयी षटकार लगावत आपले शतकही पूर्ण केले आणि भारताला विजयही मिळवून दिला. साऊथ आफ्रिकेत हा वर्ल्डकप खेळला जात आहे. अंतिम सामन्यात भारताचा सामना दुसर्‍या उपांत्य फेरीच्या विजयी संघाशी होईल.

गेल्या वर्ल्डकपमध्ये युवा खेळाडू पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकला होता. आता यावेळेस देखील वर्ल्डकप जिंकण्याची सुवर्णसंधी भारतीय संघाला मिळाली आहे.

Leave a Comment