स्मशानभूमीतच काळाचा घाला ; अंत्यसंस्कार करतानाच स्मशानभूमीचं छत कोसळून १७ जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमधील गाजियाबाद जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका बुजुर्ग व्यक्तीवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असतानाच स्मशानभूमीचं सिमेंटचं छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३८ जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. या सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण दबले असून त्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

अत्यसंस्कारसाठी आलेले लोकं पाऊस आल्याने एका छताखाली उभा राहिले होते. तेवढ्यात त्यांच्या अंगावर छत कोसळलं व ते सर्वजण त्याखाली दबल्या गेले. घटनेची माहिती मिळाताच पोलीस व एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली व बचावकार्य सुरू झालं.

या दुर्घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, या दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असं विभागीय आयुक्त अनिता मेश्राम यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. तसेच या घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’