ITR रिफंडचे स्टेट्स कसे तपासावे ते समजून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आर्थिक वर्ष 2020-21 साठी ITR भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 होती, जी करदात्यांच्या सोयीसाठी 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ करदाते 31 मार्च 2022 पर्यंत दंडासह ITR भरू शकतात. या कालावधीतही तुम्ही ITR भरला नाही, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमच्यावर कारवाई करू शकतो.

मात्र, बहुतेक पगारदार लोकं असे आहेत ज्यांनी 31 डिसेंबर 2021 किंवा त्यापूर्वी ITR दाखल केला आहे. अशा करदाते आता त्यांच्या रिफंडची वाट पाहत आहेत. रिफंडला उशीर होण्याचे कारण म्हणजे इन्कम टॅक्सच्या नवीन पोर्टलमध्ये तांत्रिक समस्या होती. मात्र, डिपार्टमेंट आता अशा करदात्यांना वेगाने रिफंड देत आहे. अशा वेळी तुम्ही तुमच्या रिफंडची स्थिती देखील तपासू शकता.

‘या’ कारणांमुळे उशीर होऊ शकतो
जर एखादी व्यक्ती किंवा व्यवसाय अजूनही इन्कम टॅक्स भरणार नसेल तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ITR रिफंड नाकारतो. अशा परिस्थितीत करदात्यांना थकीत टॅक्स भरण्यासाठी नोटीस पाठवली जाते. उर्वरित टॅक्स विहित मर्यादेत भरल्यानंतर, करदाता पुन्हा ITR साठी अर्ज करू शकतो.

इनव्हॅलिड बँक खाते
ITR रिफंडसाठी, करदात्याचे बँक खाते प्री-व्हॅलिडेट करणे आवश्यक आहे. प्री-व्हॅलिडेटेड बँक खात्याद्वारे ई-व्हेरिफिकेशन, सुरक्षित लॉगिन देखील केले जाऊ शकते. करदात्याने बँक खात्यात दिलेला मोबाईल क्रमांक आणि ईमेल इन्कम टॅक्स फॉर्ममध्ये भरलेल्या प्रमाणेच आहेत की नाही हे तपासणे आवश्यक आहे. जुळत नसल्यास, ई-फायलिंग पोर्टलवर एक वॉर्निंग साइन दिले जाईल.

अनव्हेरीफाईड ITR
ITR व्हेरिफाय केल्यानंतरच ते व्हॅलिड मानले जाते. त्याची इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्हेरिफाय केले जाऊ शकते किंवा ITR-V ची साइन केलेली कॉपी बेंगळुरूमधील सेंट्रल प्रोसेसिंग सेंटरला पाठवली पाहिजे. ITR भरल्यानंतर 120 दिवसांच्या आत ते व्हेरिफाय करणे आवश्यक आहे. आधारद्वारेही ते व्हेरिफाय करता येते. व्हेरिफाय केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या ई-मेल ऍड्रेसवर किंवा मेसेज द्वारे याबद्दल माहिती दिली जाईल.

ITR स्टेट्स कसे तपासावे ?

https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/loginला भेट देऊन लॉग इन करा.

माय अकाउंट ऑप्शनमधील रिफंड/डिमांड स्टेटस वर क्लिक करा.

ITR रिफंड फेलर डिटेल्स वेब पेजवर दिसेल.

Leave a Comment