नवी दिल्ली । मोस्ट वाँटेड दहशतवादी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोना झाल्याची चर्चा आहे. काही हिंदी माध्यमातून अशी माहिती पुढे येत आहे. अजून याची अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दाऊद इब्राहिम आणि त्याची पत्नी महजबीन कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांना कराचीच्या एका रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळते आहे.
सध्या जगभरात कोरोनाचं तांडव सुरु असताना पाकिस्तानमध्ये देखील कोरोनाचा कहर सुरु आहे. ज्यात भारताचा शत्रू दाऊद देखील आता पॉझिटीव्ह सापडला आहे. दाऊद पाकिस्तानात नसल्याचं पाकिस्तान सरकारकडून सांगण्यात येतं. त्यामुळे दाऊदला कोरोना झालाय का याची अधिकृत माहिती येणं कठीण आहे. दाऊद आणि त्याच्या पत्नीला सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड दाउद इब्राहिम पाकिस्तानमध्ये लपून बसला आहे. पाकिस्तान मात्र तो त्यांच्या देशात नसल्याचं सांगत आला आहे. भारताने अनेकदा पुरावे देवूनही पाकिस्तान हे लपवत आला आहे. कोरोना वायरस दाऊदच्या घरापर्यंत पोहोचला आहे. दाऊद इब्राहिम आणि त्याच्या पत्नीमध्ये कोरोनाचे लक्षण आढळली होती. त्याच्या घरात काम करणाऱ्या लोकांना क्वारंटाईन करण्याच आल्याचं देखील सांगण्यात येत आहे.
दाऊद पाकिस्तानातचं
1993 बॉम्बस्फोटचा दाऊद हा मास्टरमाइंड होता. त्यानंतर तो देश सोडून पळून गेला होता. दाऊद पाकिस्तानात आहे. पण तो लोकांच्या समोर येत नाही. याआधी देखील दाऊद आजारी असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण पाकिस्तानकडून याची कोणतीच माहिती दिली जात नाही. त्यामुळे आता दाऊदला कोरोना झाला असला तरी पाकिस्तानमधून याची अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता कमीच आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”