हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षातील नेते मोदी सरकारवर निशाणा साधत असतात. सध्या भारतात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं असून बेरोजगारीचा पुन्हा सातत्याने चर्चेत येत असतो. आता आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या रिपोर्टमध्ये बेरोजगारीच्या मुद्द्याला आणखी बळ मिळणार आहे. कारण इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO) आणि इंस्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट (IHD) यांनी संयुक्तपणे जाहीर केलेल्या भारताच्या रोजगार अहवालांनुसार, देशातील 83 टक्के तरुण बेरोजगार आहेत (Unemployed Rate In India) अशी माहिती समोर आली आहे.
शहरी भागात बेरोजगारीची समस्या जास्त – Unemployed Rate In India
अहवालानुसार, या सर्व बेरोजगार लोकांमध्ये सुशिक्षित तरुणांचा वाटा 2000 मध्ये 54.2% होता, मात्र तोच आकडा 2022 मध्ये वाढून 65.7% झाला आहे. तसेच सध्या शिक्षित परंतु बेरोजगार तरुणांमध्ये, पुरुषांपेक्षा (62.2%) महिलांचे प्रमाण अधिक आहे (76.7%). या अहवालात असेही दिसून येते कि, भारतातील बेरोजगारीची समस्या (Unemployed Rate In India) तरुणांमध्ये, विशेषत: शहरी भागातील शिक्षित लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. 2000 ते 2019 पर्यंत तरुण रोजगार आणि अल्प बेरोजगारी वाढली, परंतु कोविड-19 महामारीच्या काळात त्यात घट झाली. 2000 मध्ये, एकूण रोजगार असलेल्या तरुण लोकसंख्येपैकी निम्मी स्वयंरोजगार होती, 13% नियमित नोकऱ्या होत्या, तर उर्वरित 37% लोकांना प्रासंगिक नोकऱ्या होत्या.
दरम्यान, भारत पुढील दशकात 70 ते 80 लाख तरुणांना आपल्या श्रमिक कर्मचाऱ्यांमध्ये सामील करेल आणि पुढे जाण्यासाठी 5 प्रमुख धोरणात्मक क्षेत्रे सुचवेल:
- रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे
- रोजगाराच्या गुणवत्तेत सुधारणा
- श्रमिक बाजारातील असमानता संबोधित करणे
- सक्रिय श्रमिक बाजार कौशल्ये आणि धोरणे दोन्ही मजबूत करणे
- श्रमिक बाजार पद्धती आणि युवकांच्या रोजगारावरील ज्ञानातील अंतर भरून काढणे.