ढेबेवाडीत वांग नदीच्या संगमावर अज्ञात इसमाचा मृतदेह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड- ढेबेवाडी मार्गावर असलेल्या वांग नदीत अज्ञात इसमाची मृतदेह सापडला आहे. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी गावात प्रवेश करणाऱ्या वांग पुलानजीक असलेल्या दोन नदीच्या संगमावर पाण्यावर नदीत तरंगत वाहत चालेला मृतदेह दिसून आला आहे.

मुंद्रुळ कोळेकडून एका नदी पात्र व दुसरी नदीचे पात्र मराठवाडी धरणातून दुसरे पाण्याचे पात्र येत आहे. दोन्ही नदीचे पात्र एकत्र वांग नदीत मिळते. या पात्रातून आज शनिवारी दि. 18 एका इसमाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. नदीत मृतदेह असल्याची माहिती मिळताच ढेबेवाडी बाजारपेठेसह परिसरातील लोकांनी पुलावर गर्दी केली होती.

वांग नदीकाठी लोकांनी गर्दी केल्याचे व पाण्यात मृतदेह असल्याची माहिती मिळताच ढेबेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतदेह फुगलेला असून पोलिस अोळख पटविण्याचे काम करत आहेत.

Leave a Comment