Thursday, March 23, 2023

सातारा शहरात पहाटे तीनच्या सुमारास अज्ञातांनी तीन दुचाकी जाळल्या

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहरालगत उपनगर असणाऱ्या दिव्य नगरीतील शिवकृपा कॉलनीमध्ये अज्ञाताने तीन दुचाकी जाळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

या प्रकरणी अनिल जोसेफ तडाखे (वय 46, रा.दिव्य नगरी) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, दि. 25 रोजी (एम. एच- 11 बीजे- 155), (एम. एच- 11 बी.वाय. 9497), (एम. एच- 11 एए- 6759) या तीन दुचाकी पार्क केलेल्या होत्या. पहाटे 3 वाजण्याच्या मात्र अज्ञाताने दुचाकींना आग लावली. अचानक धुराचे लोट व आग दिसू लागल्यानंतर परिसरातील नागरिक घाबरुन बाहेर आले.

पहाटेच्या सुमारास अज्ञातांनी पेटवलेल्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून जळून खाकही झालेल्य आहेत. तरी पोलिसांनी या लोकांचा शोध घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच अद्याप दुचाकी जाळण्याचे कारण समजू शकलेले नाही.