Unified Pension Scheme | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणली UPS योजना; NPS आणि OPS पेक्षा मिळणार जास्त लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Unified Pension Scheme | केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना आपल्यासाठी आणत असतात. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी देखील सरकारकडून विविध योजना लागू केल्या जातात. अशातच आता केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना लागू केलेली आहे. आणि या योजनेला मंजुरी देखील दिलेली आहे. या नवीन योजनेचे नाव युनिफाईड पेन्शन स्कीम (UPS) (Unified Pension Scheme). असे आहे. या आधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एनपीएस म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अस्तित्वात होती. परंतु ही योजना सुधारणा करण्यात येत असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितलेले आहे.

आता या नवीन यूपीएस अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या शेवटी जेवढा पगार असेल, त्या पगाराच्या जवळपास 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेली ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. सुरुवातीला सुमारे 2 लाख 30 हजार एवढ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु नंतर जर राज्य सरकारने ही योजना स्वीकारली तर जवळपास लाभार्थ्यांची संख्या 9 लाखांपर्यंत जाणार आहे.

या योजनेबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माध्यमांशी बोलताना यूपीएससी प्रत्येक राज्यासाठी अनिवार्य नसल्याचे देखील सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे या योजनेची तुलना ओपीएस आणि एनपीएससी देखील करू शकतात. आणि नंतर निर्णय घेऊ शकतात. ही योजना सध्या केंद्रीय सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी असल्याचे देखील त्यांनी सांगितलेले आहे. परंतु हळूहळू प्रत्येक राज्य ही योजना स्वीकारून त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू करू शकतात.

युनिफाईड पेन्शन योजनेचा उद्देश काय ? | Unified Pension Scheme

ही योजना सरकारी कर्मचारी त्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या 10 टक्के जास्त योगदान देते. त्याचप्रमाणे सरकार हे 18.8 टक्के एवढे योगदान देणार आहे. आता सरकारने दिलेल्या अतिरिक्त 8.5% रकमेतून पूल कॉपर्स देखील तयार करण्यात येणार आहे. या योजनेनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाच्या 50% इतकी पेन्शन दिली जाणार आहे.

फॅमिली पेन्शनची तरतूद

सरकारच्या या नवीन यूपीएस पेन्शन योजनेमध्ये फॅमिली पेन्शनची देखील तरतूद करण्यात येणार आहे. जर त्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर त्याच्या नॉमिनीला त्या व्यक्तीच्या पगाराचा 60 टक्के पेन्शन मिळणार आहे . अशी माहिती देखील आलेली आहे. सरकारच्या या नवीन योजनेमुळे सगळ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता आनंद झालेला आहे. कारण त्यांना यातून चांगला फायदा होणार आहे. सरकारची ही नवीन योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू केली जाणार आहे.

UPS, NPS आणि OPS मध्ये फरक

सरकारने सध्या UPS म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम आणलेली आहे. या स्कीमनुसार कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता जसा वाढेल, तसा त्याचा लाभ देखील जास्त मिळणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना देखील लाभ मिळणार असेल. यामध्ये तुम्ही 10 वर्षे नोकरी केली असेल तर तुम्हाला कमीत कमी 10 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. याआधी दोन योजना लागू झाल्या होत्या. यातील पहिली योजना ओल्ड पेन्शन योजना म्हणजे OPS आणि दुसरे म्हणजे न्यू पेन्शन योजना NPS होती. आता सरकारने तिसरी युनिफाईड पेन्शन योजना UPS लागू केलेली आहे.

नवी पेन्शन योजना ही जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच काम करणार आहे. परंतु यात काही अतिरिक्त फायदे देखील असणार आहे. 10 ते 25 वर्षे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तेवढ्या कालावधीच्या प्रमाणातच पेन्शन मिळणार आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून वेळोवेळी महागाई भत्ते देखील दिले जाणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने 30 वर्षापेक्षा जास्त काम केले असेल, तर सहा महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता त्यांना एक रकमी दिला जाणार आहे.