Unilever चा मोठा दावा! ‘या’ माउथवॉशचा वापर करून होईल कोरोना विषाणूचा नाश, यासाठी लागतील केवळ 30 सेकं

नवी दिल्ली । ग्लोबल एफएमसीजी मेजर कंपनी (Global FMCG Major) युनिलिव्हरने (Unilever) कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाई दरम्यान एक मोठा दावा केला आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, नवीन फॉर्म्युलावर आधारित त्यांचा नवीन माउथवॉश (Mouthwash) वापरल्याच्या 30 सेकंदात 99.9 टक्के कोरोनाव्हायरस (Coronavirus) दूर करेल. जर आपल्याला सोप्या शब्दात समजून घ्यायचे असेल तर आपण कंपनीच्या या नवीन माउथवॉशचा उपयोग करुन कोविड -१९ (Covid-19) पासून सुरक्षित राहू शकता. पुढील महिन्यात कंपनी आपले हे नवीन माऊथवॉश भारतात लॉन्‍च (India Launching) करणार आहे. तथापि, कंपनीने हे देखील स्पष्ट केले आहे की, हा फॉर्मुला कोविड -१९ वरील उपचार (Cure) नाही किंवा हा प्रसार (Transmission) रोखण्यास मदत करणार नाही.

सुरुवातीच्या प्रयोगशाळेच्या चाचणीत माउथवॉश प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे
Unilever ने अहवाल दिला की अमेरिकेत, युनिलिव्हर रिसर्च लॅबने मायक्रोबॅक प्रयोगशाळेची प्रारंभिक लॅब टेस्ट (Lab Test) केली आहे, या नवीन माउथवॉश फॉर्म्युल्या मुळे तोंड व घशातील कोरोना विषाणूचे प्रमाण 99.9 टक्क्यांनी कमी होते. कोरोना विषाणू हे शिंकण्याद्वारे किंवा लाळेतील थेंब (Saliva Droplets) यांद्वारे पसरतो. यानंतर, काही प्रकरणांमध्ये गंभीर लक्षणे दिसतात तर काही प्रकरणांमध्ये लक्षणे लक्षवेधी नसतात (Asymptomatic), परंतु ती व्यक्ती संक्रमित झाली आहे, याची ओळख केवळ कोरोना टेस्टद्वारेच (Corona Test) केली जाऊ शकते. कंपनीने असे म्हटले आहे की, जर तोंडात विषाणूची संख्या कमी असेल (Virus Load) तर त्याचा प्रसार देखील कमी होईल. आतापर्यंतच्या संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापरुन, मास्क लावणे, तसेच माउथवॉशमुळे कोरोना विषाणूचा प्रसार रोखता येतो.

हिंदुस्तान युनिलिव्हर भारतात माऊथवॉश लाँच करणार आहे
युनिलिव्हर चे ओरल केअर रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रमुख जी. रॉबर्ट्स यांनी हे स्पष्ट केले आहे की, हा माउथवॉश कोविड -१९ वरील उपचार (Cure) नाही किंवा हा प्रसार (Transmission) रोखण्यास मदत करणार नाही. तथापि, आतापर्यंतच्या चाचण्यांच्या निकालांच्या आधारे आपण असे म्हणू शकतो की आमचा हा नवीन माउथवॉश तोंडात असलेल्या कोरोना विषाणूविरूद्ध प्रभावी ठरला आहे. ते म्हणाले की, या जागतिक महामारीच्या सध्याच्या टप्प्यावर कंपनीला माऊथवॉशच्या टेस्टचा रिझल्ट जगासमोर त्याच्या नव्या फॉर्म्युलाच्या आधारे शेअर करणे महत्त्वाचे वाटले. म्हणून आम्ही या क्षणी फक्त चाचण्यांचे निकाल सांगत आहोत. त्यांनी सांगितले की, कंपनी पुढील महिन्यात CPC टेक्‍नोलॉजी (Cetylpyridinium Chloride Technology) वर बनविलेले माउथवॉश हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) अंतर्गत पेप्सोडेंड जर्मिक माऊथ रिन्स लिक्विड बाजारात आणणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like