नवी दिल्ली । कोरोना संकटाचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. महसुलात घट झाली असून देशाच्या तिजोरीवर परिणाम झाला आहे. याचा थेट परिणाम देशाच्या आर्थिक विकासावर झाला आहे. अशा बिकट परिस्थितीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी अतिरिक्त महसूल प्राप्तीसाठी ५० हून अधिक वस्तूंवर आयातशुल्क वाढविण्याचा केंद्राचा प्रस्ताव आहे.
आयात शुल्कात वाढ करून ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला गती देण्याचा केंद्राचा विचार आहे. केंद्रानं आयात शुल्कात वाढ केल्यास त्याच्या थेट परिणाम भारतात आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमतींवर होणार आहे. आयात शुल्क वाढल्यास टीव्ही, लॅपटॉप, महागडे फर्निचर, कार, स्मार्टफोन, फ्रीज, इलेक्ट्रिक कार या गोष्टी महागण्याची शक्यता आहे. आयात शुल्कात ५ ते १० टक्के वाढ करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. याप्रस्ताव मंजूर झाल्यास वाढीव आयात शुल्काच्या माध्यमातून देशाच्या तिजोरीत सुमारे २०० ते २१० अब्ज रुपयांचा महसूल गोळा होईल, असा अंदाज आहे.
दरम्यान, टेस्लाने बेंगळुरू येथे इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीचा कारखाना सुरू करण्याचे सूतोवाच केले आहे. फर्निचर आणि इलेक्ट्रिक कार यांसारख्या वस्तूंवर आयातशुल्क वाढल्याने आयकेईए आणि टेस्ला यांसारख्या कंपन्या केंद्रावर नाराज होण्याची शक्यता आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.