Union Budget 2024 | आज 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकारचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर आहे. त्यामुळे निर्मला सीतारामन यादेखील मोदींच्या कार्यकाळात सलग तिसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहे. त्यामुळे आता या अर्थसंकल्पांमध्ये नक्की काय घोषणा केल्या जाणार आहेत .यावर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. एकेक घोषणा होत आहे. अशातच आता या अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकार तब्बल 1 कोटी तरुणांना 500 मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी देणार आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याला तरुणांना 6000 रुपये तसेच अतिरिक्त भत्यासह 5 हजार रुपये भत्ता देखील दिला जाणार आहे. त्यामुळेही तरुणांसाठी एक मोठी संधी आहे.
रोजगार संबंधित प्रोत्साहन अंतर्गत तीन मोठ्या योजना | Union Budget 2024
पहिल्यांदा नोकरी करणारे
जे लोक प्रथमच नोकरी करत आहे. त्यांच्या ईपीएफओमध्ये नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपयांपर्यंत महिन्याला पगार दिला जाणार आहे. या पगाराच्या 3 हप्त्यांमध्ये लाभ मिळणार आहे.
उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मिती
जे लोक नोकरीच्या पहिल्या 4 वर्षात कर्मचारी आणि नियुक्त या दोघांनाही त्यांच्या ईपीएफओ योगदानानुसार प्रोत्साहन दिले जाणार आहे.
नियुक्तांना समर्थन | Union Budget 2024
या योजनेमध्ये 2 वर्षासाठी प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या ईपीएफओ योगदानाची प्रति महिन्यात 3 हजार रुपये परतफेड देखील केली जाणार आहे.
मोदी सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या या घोषणेनंतर या योजनांचा तब्बल 30 लाख तरुणांना फायदा होणार आहे. त्यांना अतिरिक्त रोजगार निर्माण होण्यास देखील मदत होणार आहे. त्यामुळे आता आपल्या देशातील बेरोजगारी कमी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत सरकार ईपीएफओमध्ये योगदानासाठी दरमहा 3000 रुपये देणार आहे. या योजनेचा लाभ जवळपास 50 लाख लोकांना होणार आहे.