Union Budget 2025 : 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प; शेअर बाजाराने घेतला मोठा निर्णय

Union Budget 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Union Budget 2025 – केंद्रीय अर्थसंकल्प 2025 येत्या 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत . हा मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा पूर्ण अर्थसंकल्प असेल. सीतारामन यांचा हा आठवा अर्थसंकल्प असून त्यांनी याआधी सहा वार्षिक आणि दोन अंतरिम अर्थसंकल्प सादर केले आहेत. यातली महत्वाची गोष्ट म्हणजे 1 फेब्रुवारीला शनिवार असूनही भारतीय शेअर बाजार सुरू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर चला याबदल अधिक माहिती जाणून घेऊयात.

विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवरही थेट प्रक्षेपण –

सरकारी दूरचित्रवाहिनी डीडी न्यूज आणि संसद टीव्हीवर हा अर्थसंकल्प थेट प्रसारित केला जाईल. तसेच डीडी न्यूजच्या आणि संसद टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलवरही तो पाहता येईल. जनतेला अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे सोप्या भाषेत समजावून देण्यासाठी विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवरही थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला या अर्थसंकल्पाबद्दल सर्व माहिती मिळेल.

करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता (Union Budget 2025) –

आयकरदात्यांमध्ये कर सवलतीबाबत मोठ्या अपेक्षा आहेत. नवीन कर व्यवस्थेत आणखी प्रोत्साहन मिळावे अशी मागणी अनेक करदात्यांकडून होत आहे. टॅक्सस्पॅनरचे सीईओ सुधीर कौशिक यांनी सांगितले की, दरवर्षी अर्थसंकल्पातील कर बदल हे दीर्घकालीन आर्थिक नियोजनावर परिणाम करणारे असतात. त्यामुळे यंदा करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शनिवार असूनही शेअर बाजार सुरू-

1 फेब्रुवारीला शनिवार असूनही भारतीय शेअर बाजार (Indian stock market) सुरू राहणार आहेत. अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजार बंद न ठेवता विशेष व्यापार सत्र आयोजित केले जाईल. यासाठी स्टॉक एक्स्चेंजने विशेष परिपत्रक जारी केले आहे. अर्थसंकल्पातील घोषणांचा (Union Budget 2025) शेअर बाजारावर त्वरित परिणाम होतो. त्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष अर्थसंकल्पीय घोषणांकडे लागले आहे.