Thursday, March 30, 2023

भारताला छेडण्याचा प्रयत्न केल्यास सोडणार नाही; राजनाथ सिंह यांचा इशारा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतावर विरोधकांकडून हल्ल्याचे अनेकवेळा प्रयत्न केले गेले. अनेकवेळा लष्करावर गोळीबार झाला. याबाबत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. “भारताने आजवर आक्रमण केलेले नाही किंवा कब्जा केलेला नाही. भारताला जो छेडेल त्याला भारत सोडणार नाही. आम्ही इकडंच नाही तर तिकडं जाऊनही मारु शकतो, अशा शब्दात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इशारा दिला आहे.

केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत दोंडाईचा येथे विविध विकासकामांचे उद्घाटन आज पार पडले. यावेळी ते म्हणाले की, सगळे बदलू शकतात पण शेजारी पाकिस्तान बदलू शकत नाहीत. मात्र, आम्ही भारत मातेचे मस्तक झुकू देणार नाहीत. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र यांचा जवळचा संबंध आहे. मी महाराष्ट्रात जेव्हा येतो तेव्हा मला खूप आनंद होतो. वीरांची भूमी म्हणून महाराष्ट्र भूमीची ओळख आहे. आजही केवळ महाराष्ट्रात नाही तर सगळीकडे शिवाजी महाराज भरलेले आहेत.

- Advertisement -

अमेरिका धनवान आहे म्हणून तिथले रस्ते चांगले नाही तर सरकार धनवान आहे म्हणून रस्ते चांगले आहेत. नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली उत्तम काम सुरू आहे, असं सिंह म्हणाले. बिपीन रावत यांच्या नावाने पहिला मार्ग या ठिकाणी सुरू झाला याचे श्रेय दोंडाईचा नगरपालिकेला जाते. देशाच्या जवानांना सुरक्षित ठेऊ आणि देशाचा आपण विकास करू राम मंदिराची निर्मिती न्यायव्यस्थेतून झाली आहे, असेही सिह यांनी सांगितले.