पी. चिदंबरम यांना जामीन नाहीच ; २६ ऑगस्ट पर्यंत सीबीआय कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा जामीन पुन्हा एकदा न्यायालयाने फेटाळला असून त्यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. पी. चिदंबरम तपासात सहकार्य करत नाहीत. त्यामुळे त्यांना कोठडी देण्यात यावी अशी मागणी सीबीआयच्या वतीने करण्यात आली होती. त्याला दिल्ली उच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे.

पी. चिदंबरम यांचे वकील पत्र काँग्रेस नेते आणि माजी कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी घेतले आहे. त्यांनी आज पी. चिदंबरम यांच्या बाजूने युक्तिवाद केला. तसेच सीबीआयने पी. चिदंबरम यांना १२ प्रश्न न्यायालयाच्या समक्ष विचाराले त्यापैकी ६ प्रश्नांची उत्तरे चिदंबरम यांनी दिली. तर ६ प्रश्नांची उत्तरे देणे टाळले. या उत्तरे देण्याच्या टाळलेल्या प्रश्नांची उत्तरे काढून घेण्यास सीबीआयने चिदंबरम यांच्या कोठडीची मागणी केली त्याला न्यायालयाने दुजोरा देत कोठडी मंजूर केली.

आयएनएक्स मीडियाला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून बेकायदेशीरपणे मंजुरी मिळवून देण्यासाठी ३०५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप चिदंबरम यांच्यावर आहे. हे प्रकरण २००७ मधील असून, त्यावेळी चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री होते. या प्रकरणात सीबीआय आणि ईडीने यापूर्वीच चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना अटक केली होती.

Leave a Comment