चिंता आणखी वाढली! देशात कोरोनाबाधितांची संख्या ३५ हजार पार..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा कालावधी संपण्यासाठी आता केवळ दोन दिवस उरलेत. मात्र, आतापर्यंतच्या लॉकडाउनच्या कालावधीत देशभरात कोरोनावर अजूनही अपॆक्षित असं नियंत्रण मिळवता आलं नाही आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भर पडतच आहे. ताज्या आकडेवारीनुसार आजपर्यंत देशातील करोनाबाधितांची संख्या ३५ हजार ०४३ वर पोहचली आहे. तर यातील ८ हजार ८८९ रुग्णांवर उपचार यशस्वी ठरले आहेत. कोरोनामुळं गेलेल्या बळींची संख्या १ हजार १४७ इतकी झाली असून सध्या देशात २५,००७ कोरोनाबाधित रुग्णांवर जणांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.

गेल्या २४ तासांत १९९३ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत परंतु, याच दरम्यान तब्बल ६०० रुग्ण करोनामुक्त झाले. करोनाचा रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचं प्रमाण) २५.३७ वर आहे. तसेच देशातील जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागण्यात आलंय, असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, दुसऱ्या राज्यांत अडकलेल्या मजूर, विद्यार्थी आणि इतर लोकांना बाहेर काढण्यासाठी विशेष रेल्वेची परवानगी सरकारनं दिलेली आहे. यासाठी व्यवस्था रेल्वे बोर्डाकडून केली जाईल, असं आज गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

 

Leave a Comment