जावली | जावली तालुक्यात मारली घाटामध्ये गेल्यावर्षी सांगली जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील सख्या दोन भाऊ व पती-पत्नी यांचा खून करून त्यांना घाटातल्या उंच कड्यावरून खाली टाकून देऊन पोलिसांना कायमस्वरूपी गुंगारा देणारा सोमर्डी (ता. जावळी) येथील योगेश निकम यांच्या या खुनाचा गुन्हाने संपूर्ण महाराष्ट्रमध्ये खळबळ उडाली होती. यावेळी मुख्य तपासी अधिकारी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून गतवर्षी कार्यरत असणारे अजित टिके यांनी या प्रकरणाचा छडा लावला. त्यांची दखल केंद्रीय गृहमंत्री विभागाने घेतली असून तत्कालीन वाई उपविभागीय पोलिस अधिकारी अजित तिके यांना 2020- 21 साठी तपासात उत्कृष्ट तपासासाठी केंद्रीय गृहमंत्री पदक बहाल करण्यात आले आहे.
सोमर्डी येथील खूनातील आरोपीला अत्यंत शिताफीने समयसूचकता दाखवत ब्रिलियंट माईंड वापरून 5 कुटुंबातील 4 जणांचा खून करणारा योगेश निकम याला जेरबंद केला होता. वास्तविक खून करणारा आरोपी योगेश निकम हा शातिर दिमागचा होता. त्याने एकाच कुटुंबातील चार जणांची खून वेगवेगळ्या पद्धतीने काही दिवसाचे अंतर ठेवून केवळ पैशासाठी चार बळी घेतले होते. हे उघडकीस आणणे तसे पोलिसांसाठी खूप आव्हानात्मक होते. मात्र योग्य पोलिसिंग व डिटेक्शन व खून करणाऱ्या आरोपीची मानसिकता पडताळता खुनाचा आरोपी पकडणे आव्हानात्मक असताना देखील वाई डीवायएसपी अजित टीके व त्यांच्या टीमने अवघ्या 24 तासात आरोपीचा धागादोरा धरला. एका महिलेच्या आज्ञात सापडलेला मृतदेह पासूनचा प्रवास दुसऱ्या सापडलेला मृतदेह पर्यंत पोहोचला व त्यानंतर दोन सख्ख्या भावाचे हाडांचे सापळे मृतदेह शोधण्यापर्यंत आरोपीच्या कुणाचा हा प्रवास व पोलीस तपासाचा हा संपूर्ण प्रवास थक्क करणारा होता.
या सर्व घटनेची दखल अजित टिके यांना 2020- 21 साठी तपासात उत्कृष्ट तपासासाठी केंद्रीय गृहमंत्री पदक बहाल करण्यात आले आहे. गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टीने सगळ्यात बेस्ट इन्वेस्टीगेशन करून गुन्हा उघडकीस आणणाऱ्या अधिकार्यांसाठी हे पदक केंद्रीय गृहमंत्री विभागाच्या माध्यमातून देण्यात येते. 2018 पासून पदक बहाल करण्याची सुरुवात करण्यात आली आहे. हे पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांमध्ये 15 सीबीआयचे तर मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र पोलिसांचे प्रत्येकी 11 अधिकारी या पदकासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील वाई उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून पदभार घेतलेले व विद्यमान सांगली येथे सध्या कार्यरत असणारे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टीके यांचा सन्मान केंद्रीय गृहमंत्री विभागाकडून तपासात गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये विशेष कामगिरी केल्याबद्दल हे पदक देण्यात येणार आहे.