नवी दिल्ली । केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत शौर्य पुरस्कार अर्थात Gallantry awards ची घोषणा केली आहे. त्यानुसार देशातील एकूण ९२६ पोलिस कर्मचाऱ्यांना शौर्य पदके प्रदान करण्यात येत आहेत. पुरस्कारप्राप्त एकूण पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील एकूण ५८ पोलिसांचा समावेश आहे. यांमध्ये महाराष्ट्रातील ५ पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, १४ पोलिसांना शौर्य पदके (Gallantry Awards), तर प्रशंसनीय सेवेसाठी एकूण ३९ जणांना ‘पोलीस पदक’ देण्यात आली आहेत.
जाहीर केलेल्या एकूण ९२६ शौर्य पदकांपैकी पोलिसांच्या उल्लेखनीय पराक्रमाबाबत एकूण २१५ पोलिस कर्मचार्यांना शौर्य (पीएमजी) पोलिस पदके देण्यात आली आहेत. तर विशेष सेवेसाठी एकूण ८० राष्ट्रपती पोलिस पदके आणि गुणवंत सेवेसाठी एकूण ६३१ पोलिस पदके प्रदान करण्यात आले आहेत. देण्यात आलेल्या एकूण २१५ शौर्य पुरस्कारांपैकी १२३ पुरस्कार हे जम्मू आणि काश्मीरमध्ये विशेष कामगिरीसाठी, २९ पुरस्कार हे नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईसाठी, तर ८ पुरस्कार हे ईशान्य भारतातील कामगिरीसाठी देण्यात आले आहेत.
देण्यात आलेल्या एकूण २१५ शौर्य पुरस्कारांपैकी १२३ पुरस्कार हे जम्मू आणि काश्मीरमध्ये विशेष कामगिरीसाठी, २९ पुरस्कार हे नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईसाठी, तर ८ पुरस्कार हे ईशान्य भारतातील कामगिरीसाठी देण्यात आले आहेत. शौर्य पुरस्कार प्राप्त झालेल्या कर्मचार्यांमध्ये ५५ जवान सीआरपीएफचे (The Central Reserve Police Force) आहेत. तर ८१ जवान हे जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे, २३ उत्तर प्रदेश पोलिस दलातील, आणि १४ पोलिस महाराष्ट्र पोलिस दलातील आहेत. तसेच १६ दिल्ली पोलिस दलातील, तसेच १२ झारखंड पोलिस दलातील आहेत. उर्वरित पोलिस कर्मचारी हे राज्य, केंद्र शासित प्रदेश आणि आणि केंद्रीय पोलिसांच्या सशस्त्र दलांमधील (Armed forces) आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”