हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र हा भारताच्या लसीकरण मोहीमेत कायमच आग्रेसर राहिलेला आहे. काल रविवारी महाराष्ट्राने 9.14 केटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री भरती पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. “भारतात अजूनही कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही. त्यामुळे अजूनही खबरदारी घेणे गरजेचे आहे,” असे पवार यांनी म्हंटले आहे.
केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी देशातील कोरोना परिस्थितीबाबत माहिती दिली. यावेळी त्या म्हणाल्या की, कोरोनाच्या काळात पुणे महापालिकेकडून चांगले काम झाले. ऑक्सीजन प्लांटही या ठिकाणी उभारण्यात आले. देशात कोरोनाची दुसरी लाट अचानक आली होती. महाराष्ट्र आणि केरळात अजुनही रुग्ण आहेत.
लॉकडाउन किंवा निर्बंधांबाबत सांगायचे झाले तर या थीआकनी असलेल्या स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा अशी केंद्राची भूमिका आहे. सध्या सर्वकाही सुरु झाले तरी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, भारतात दुसरी लाट अजून संपलेली नाही. काही देशामधे तिसरी, चौथी लाट आल्याच दिसलय. त्यामुळे महाराष्ट्रात त्या दृष्टीकोनातून तयारी सुरु आहे. सध्यातरी पहिल्या आणि दुसऱ्या लसीच्या डोसबाबात गाईडलाईन्स आहेत. बुस्टर डोसबाबात नाही.लहान मुलांच्या लसीकरणबाबत आवश्यक बाबी लवकरच पूर्ण केल्या जातील, असेही पवार म्हणाल्या.