आम्ही घरात बसून काम करु शकत नाही; केंद्रीय मंत्री पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात भाजप खासदारांची जन-आशिर्वाद यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली जात आहे. यावेळी केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. “आम्ही घरात बसून काम करु शकत नाही. त्यामुळे आम्ही जनतेत जात आहोत. लोकशाहीने दिलेला अधिकाराचे कोव्हीड नियमांचे पालन करुन आम्ही जन आशिर्वाद यात्रा करत आहे,” असा टोला पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी जन आशिर्वाद यात्रे दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.यावेळी त्या म्हणाल्या कि, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्हाला जनतेपासुन तोडु नका अशा प्रकारच्या टिका करुन राजकारण करु नका. राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती अद्यापही चिंताजनक आहे. त्या जिल्ह्यांमध्ये मायक्रो कंटेनमेंट झोन तयार करण्याची गरज आहे. ईशान्येकडील राज्यांनी याची कडक अंमलबजावणी करत कोरोना आटोक्यात आणला आहे.

यावेळी डॉ. भारती पवार यांनी कोरोना डोसबाबत माहिती देताना म्हंटले की, राज्यात एक लाख डोस वाया गेले आहेत. ऑक्सिजन अभावी किती रुग्णांचा मृत्यु झाला याबाबत राज्याकडुन केंद्राला अद्यापही माहिती मिळालेली नाही. केंद्राने प्रत्येक राज्याला पत्र लिहुन १३ ऑगस्ट पर्यत आकडेवारी देण्यास सांगितले असल्याचे पवार यांनी सांगितले.

Leave a Comment