जावयावरील कारवाईमुळेच मलिकांकडून वानखेडेंवर बेछूट आरोप – रामदास आठवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याकडून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांवर आरोप केले जात आहेत. याबाबत वानखेडे यांची पत्नी तथा अभिनेत्री क्रांती रेडकर हिने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. “नवाब मलिक यांच्याकडून वानखेडे यांच्याविरोधात टीका केली जात आहे. त्यामागचे खरे कारण मलिकांचा जावई 8 महिने तुरुंगात होता. आपल्या जावयावरील कारवाईमुळेच मलिकांकडून वानखेडेंवर बेछूट आरोप केले जात आहे,” अशी टीका आठवले यांनी केली.

मंत्री रामदास आठवले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी माझी आज भेट घेतली. यावेळी त्यांनी मला सगळी कागदपत्रे दाखवली. समीर वानखेडे यांनी मुस्लिम मुलीशी लग्न केले हे खरे आहे. पण ते जन्माने दलित आहेत. समीर आणि क्रांतीचे लग्न 2016 मध्ये झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिकांकडून वानखेडे यांच्याविरोधात मोर्चा काढण्यात आला. आरोपही करण्यात आले आहेत. मात्र, त्याचं कारण मलिकांचा जावई आठ महिने तुरुंगात होता. समीर वानखेडे आंबेडकरांचा अनुयायी आहेत. एका उच्चशिक्षित, चांगलयाअधिकाऱ्याला बदनाम करण्याचं काम सुरु आहे. आर्यन खानच्या केसमध्ये जर त्या 19 लोकांकडे ड्रग्ज मिळाले नाही, त्यांनी सेवन केले नाही, तर कोर्टाने 21 दिवस जामीन का दिला नाही? असा सवाल आठवले यांनी केला.

नवाब मलिकांचे आरोप हे खोटेच – आठवले

राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे व त्यांच्या कुटुंबियांवर आरोप केले जात आहेत. मात्र, मलिकांचे आरोप हे साफ खोटे आहेत. समीर वानखेडे मुस्लिम नव्हे तर दलित आहेत, असेही रामदास आठवले यांनी सांगितले.

Leave a Comment