औरंगाबाद | आज औरंगाबाद शहरात रिपब्लिकन सेना तसेच विध्यार्थी कामगार सेना यांनी दिल्लीगेट येथील पेट्रोल पंपाजवळ मोदी चॉकलेट वाटत लक्षवेधी आंदोलन केले. मोदी सरकारने अच्छे दिन आयेंगे म्हणत, पेट्रोल तसेच डिझेल आणि गॅसचे एकाच दिवसात भाव वाढवून गरीब जनतेला चॉकलेट दिले आहे. असा आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे.
याबरोबरच मोदी सरकारने जनतेला आश्वासन केले होते पेट्रोल, गॅस, डिझेलचे भाव कमी करू पण अद्यापही भाव कमी झालेले नाहीत. उलट महागाई अजून जास्त वाढली आहे. या प्रकारे मोदी सरकार जनतेला चॉकलेट देत आहे. तसेच आश्वासन देऊनही जनतेची वारंवार फसकणूक केली जात आहे. असे मत आंदोलकर्त्यांनी मांडले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी व आंदोलनकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला.
रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धोधन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली चॉकलेट आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव कमी केले गेले नाही तर संपूर्ण राज्यभारत उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा रिपब्लिकनसेनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारला दिला आहे. तसेच हे आंदोलन आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार करण्यात आले आहे असही त्यांनी सांगितले. यावेळी पेट्रोल पंपावर येणाऱ्या प्रत्येक वाहन चालकांना आंदोलनकर्त्यांडून ‘मोदी चॉकलेट’ देण्यात आले. इंधनाच्या दराचे आकडे असलेले फलक तसेच बनावट रॅपर असलेले ‘मोदी चॉकलेट’ हवेत उंचावत आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.
जिल्हाध्यक्ष प्रा. सिद्बोधन मोरे, काकासाहेब गायकवाड, यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. तर मराठवाडा संघटक आनंद कस्तुरे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम, मनीषा साळुंके, चंद्रकांत रुपेकर, सचिन गायकवाड, विकास हिवराळे, गौतम गायकवाड, बबन साठे, कैलास निळे, राहुल कानडे, शैलेंद्र म्हस्के, दिनेश गवळे, सचिन जगधने, दीपक जाधव, कुणाल भालेराव, सागर प्रधान, सचिन शिंगाडे, रामराव नरवडे, पप्पू दाभाडे, प्रवीण बनकर, रवी मोरे, नंदू मनोहर, कृष्णा मोरे, आनंद भिसे, पुष्पा स्वामी, के.जी.पवार, जय कारके, मयूर पवार आदींसह रिपब्लिकन विद्यार्थी सेना, रिपब्लिकन कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.