भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प म्हणाले,’ आम्ही मध्यस्थी करण्यास तयार आहोत’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या सीमावादात हस्तक्षेप करत म्हंटले की,’ जर दोन्ही देश सहमत असतील तर यासाठी ते मध्यस्थी करण्यासाठी तयार आहेत. ५ मे रोजी सुमारे २५० चिनी आणि भारतीय सैनिकांमध्ये चकमक उडाली त्यावरून लडाखमध्ये या दोन्ही देशांमधील परिस्थिती तणावग्रस्त बनली. या घटनेत भारतीय आणि चीनी बाजूचे सुमारे १०० सैनिक जखमी झालेत. या घटनेनंतर चीनने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उत्तर सिक्कीममध्येही ९ मे रोजी अशीच एक चकमक झाल्याचे उघडकीस आले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले की,’आम्ही भारत आणि चीन या दोन्ही देशांना याबाबत माहिती दिली आहे. आता अमेरिका या दोन्ही देशांमधील सीमावादात मध्यस्थी करण्यास सज्ज, इच्छुक आणि सक्षम आहे. जर दोन्ही देशांनी यावर सहमती दिली तर आपण तसे करू शकतो. धन्यवाद.’

 

कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हंटले की, नरेंद्र मोदींच्या भारताकडे आता कोणी वाईट हेतूने पाहू शकत नाही. पूर्व लडाख सीमेवर भारत आणि चिनी सैन्याच्या तणाव वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सैन्य प्रमुखांची बैठक घेतली. असे मानले जाते की, या बैठकीत बाहेरील सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतीय लष्कराच्या तयारीवर चर्चा झाली.

पॅनयाँग लेक, गॅलवान व्हॅली, डेमचोक आणि दौलत बेग ओल्डि येथे गेल्या २० दिवसांपासून भारतीय आणि चिनी सैन्य आक्रमकता दाखवत आहेत. अधिकृत सूत्रांनी काल सांगितले कि,’चीनबरोबरच्या या ३५०० कि.मी. सीमेवरील धोरणात्मक भागात भारत आपले पायाभूत सुविधा विकास प्रकल्प थांबविणार नाही. तसेच चीनही त्यांना रोखण्यासाठी कुठल्याही दबावात येणार नाही.

चीनने बुधवारी म्हटले की, भारताच्या सीमेवरची परिस्थिती पूर्णपणे स्थिर आणि नियंत्रणात आहे. दोन्ही देशांकडे संवाद आणि विचारविनिमयातून प्रश्न सोडविण्यासाठी योग्य यंत्रणा आणि संचार वाहिन्या आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारतीय आणि चिनी सैन्यांदरम्यान सुरू असलेल्या सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ही टीका केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले की,’ सीमेवरील मुद्द्यांबाबत चीनची भूमिका स्पष्ट आणि सातत्यपूर्ण आहे. ते म्हणाले की,’आम्ही दोन्ही देशांमधील कराराचे काटेकोरपणे पालन करीत आहोत.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.