कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठांच्या परीक्षा घेऊ- उदय सामंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं राज्यातील महाविद्यालय, विद्यापीठांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. लॉकडाउनचा कालावधी वाढल्यानं या परीक्षा कधी होणार हा एकाच प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहे. कोरोनामुळं संपूर्ण शैक्षणिक सत्राच वेळापत्रक कोलमडल आहे. याच थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होणार आहे. अशा संभ्रमाच्या परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठांच्या परीक्षा घेतल्या जातील, अशी ग्वाही माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

विद्यापीठांच्या परीक्षा कोणत्याही परिस्थितीत घेतल्या जातील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. रविवारी दहावीचा भूगोलाचा पेपर आणि अकरावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी घेतला होता. त्यानंतर विद्यापीठांच्या इतर परीक्षा रद्द झाल्या, अशाप्रकारचं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर उदय सामंत यांनी या परीक्षा रद्द होणार नसल्याची माहिती दिली.

उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं कोणत्याही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला नाही. तसंच परीक्षांसंबंधी कुलगुरुंची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती लवकरच अहवाल देईल. त्यानंतर त्यासंबंधी निर्णय घेतला जाईल, असं सामंत यांनी स्पष्ट केलं. करोनाच्या पार्श्वभूमीवर जर आणीबाणीची परिस्थितीत निर्माण झाल्यास भविष्यात परीक्षा कशा घेव्या याबाबत निर्णय होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment