Friday, June 9, 2023

‘लॉकडाऊन‘मध्येही होणार विद्यापीठ परीक्षा, २६, ३०, ३१ व १ एप्रिल रोजीचे विद्यापीठाचे पेपर ठरल्यावेळीच

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरु आहेत, बीड जिल्हयात २६ मार्च ते ४ एप्रिल ‘लॉकडाऊन‘ आहे तथापि या काळातील सर्व पेपर संबधित महाविद्यालयात होणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील पदवी अव्यावसायिक अभ्यासक्रम अभ्यासक्रमांच्या परीक्षा १६ मार्चपासून सुरु झालेल्या आहेत. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील बीड, जालना, उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्हयांत या परीक्षा होत आहेत. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने या परीक्षा होत आहेत. जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, यांनी बीड जिल्हयासाठी २५ मार्चच्या मध्यरात्री पासून लॉकडाऊन लागू घोषित करण्यात आहे.

सध्या विद्यापीठाच्या विविध पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु आहेत. या काळात २६ मार्च, ३० मार्च व ३१ मार्च व १ एप्रिल रोजी विद्यापीठाचे पेपर असणार आहेत. तर उर्वरित दिवशी पेपरला सुट्टया आहेत. या परीक्षा या पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरु राहतील. त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. तरी ही बाब सर्व संबधित विद्यार्थी, पालक, अध्यापक व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी. तसेच कोव्हीड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषगांने नियमांचे काटेकोर पणे पालन करुन परीक्षा घेण्यात याव्यात. तसेच या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत-जास्त ऑनलाईन पध्दतीने परीक्षा देण्यासाठी प्रवृत्त करावे, असे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी कळविले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group