विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा ‘या’ तारखेपासून होणार सुरू

औरंगाबाद – शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सन 2021-22 या चालू शैक्षणिक वर्षाचा हिवाळी सत्राच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची तयारी केली असून, 8 फेब्रुवारी पासून पदवी तर 22 फेब्रुवारीपासून पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

यासंदर्भात विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी सांगितले की, चालू शैक्षणिक वर्षातील हिवाळी सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक तयार झाले असून, सर्व पारंपारिक पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा 8 फेब्रुवारी पासून तसेच 22 फेब्रुवारीपासून पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

या सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. त्यानुसार पेपर सेटर्सकडून ऑनलाईन पेपर चे नियोजन केले जात आहे.