व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

हॅलो महाराष्ट्राचा इम्पॅक्ट ! विद्यापीठाने ‘ते’ बोर्ड केले अपडेट

औरंगाबाद – शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत प्रवेश करतानाच त्या ठिकाणी विद्यापीठातील अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या सदस्यांच्या नावांचे बोर्ड त्या ठिकाणी लावण्यात आलेले होते. परंतु त्यातील बहुतांश सदस्य हे आपल्या कार्यातून सेवामुक्त झालेले आहेत. तसेच सध्या या समितीत असलेल्या सदस्यांपैकी एकाही सदस्याचे नाव त्या पाठीवर नसल्याचे दिसून आले. यामुळे विद्यार्थ्यांनी काही तक्रार असल्यास ती नेमकी कोणाकडे करावी असा यक्ष प्रश्न उपस्थित होत होता. याकडे विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. तसेच आजच्या या एकविसाव्या शतकात विद्यापीठ मात्र अपडेट नसल्याचे यावरून दिसून येते. या आशयाची बातमी हॅलो महाराष्ट्राने प्रकाशित केली होती. या बातमीची दाखल घेत आता विद्यापीठ प्रशासनाने ते बोर्ड अपडेट केले आहे.

विद्यापीठातील एका विद्यार्थीनीला जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी आक्षेपार्ह मेसेज केले होते. त्यानंतर संबंधित विद्यार्थीनीने विद्यापीठाच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या प्रमुखांकडे याची केली. परंतु त्यांनी या तक्रारीची दखल न घेता उलट त्या विद्यार्थीनीला दामिनी सिनेमाची स्टोरी सांगून घाबरवण्याचा प्रयत्न केला. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अत्याचाराविरोधात तक्रार करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. परंतु याठिकाणी या समितीने त्या विद्यार्थीनीच्या तक्रारीवर समर्पक कारवाई केली नाही. यामुळे विद्यापीठाची तक्रार निवारण समिती चर्चेत आली होती.

विद्यापीठात अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या सदस्यांच्या नावांचे बोर्ड होते. त्यावर जुन्याच सदस्यांची नावे होती. याकडे हॅलो महाराष्ट्राने लक्ष देऊन याविषयी बातमी प्रकाशित केली होती. या बातमीची दाखल घेत अखेर विद्यापीठाने हे बोर्ड बदलून सध्या असलेल्या सदस्यांची नावे असलेला बोर्ड लावण्यात आला आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. परंतु विद्यापीठाने मुख्य प्रशासकीय इमारतीमधील बोर्ड बदलले असले तरी परीक्षा भवन मध्ये असलेले बोर्ड मात्र अद्याप बदलण्यात आलेले नाही. याकडे विद्यापीठ प्रशासनाने लक्ष देऊन ते बोर्ड देखील अपडेट करावे अशी मागणी विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.