विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क विद्यापीठ कमी करणार – अभाविप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांची काल भेट घेऊन विविध शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा केली व मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी अभाविपच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार विद्यापीठांना विविध शुल्क माफ करण्यात यावे अश्या विविध मागण्या करण्यात आल्या.

यामध्ये जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन, कॉलेज मॅक्झिन शुल्क, संगणक शुल्क, वैद्यकीय मदत निधी, युथ फेस्टिवल, प्रयोगशाळा व ग्रंथालय इत्यादी शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना सवलत देण्यासंदर्भात च्या सूचना महाविद्यालयांना दिलेल्या आहेत तरी विद्यापीठाने तात्काळ या संदर्भात निर्णय घेऊन विद्यार्थी व पालकांना दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे अभाविपने केली आहे. तसेच वाणिज्य पदवी शाखेच्या प्रथम वर्ष प्रथम सत्र परीक्षेमध्ये विद्यार्थी मोठ्यप्रमानात विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणीमुळे नापास झाले होते. तदनंतर फेरतपासणी केल्यानंतर अडचण दूर होऊन त्या विषयात विद्यार्थी उत्तीर्ण झाले परंतु त्यापूर्वी विद्यार्थ्यांकडून त्या विषयाचे परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले आहे ते शुल्क विद्यापीठाने योजना करून विद्यार्थ्यांना परत करावे असी मागणी विद्यार्थी परिषदेने केली आहे.

सादर मागण्यांचा गांभीर्याने विचार करत सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी विद्यार्थी परिषदेने केली आहे. या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करत ज्या सुविधांचा वापर विद्यार्थ्यांनी केला नाही त्यासुविधांचे शैक्षणिक शुल्क कमी करण्यासंदर्भात दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन यावेळी कुलगुरूंनी दिले. यावेळी अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री श्री सिद्धेश्वर लटपटे, महानगर मंत्री निकेतन कोठारी, जिल्हा संयोजक श्यामसुंदर सोडगीर, महानगर सहमंत्री ऋषिकेश केकाण, दीपक टोनपे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment