सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
सांगली शहरातील कोल्हापूर रोडवर असणाऱ्या चिंतामणी मंगल कार्यालयाजवळ असलेल्या एका गटारीमध्ये अज्ञात व्यक्तीचा संशयास्पफ मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने शहर पोलिसांना कल्पना दिली. शहर पोलिसांनी घटनास्थळी येत मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेहाच्या उत्तर तपासणीसाठी वसंतदादा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे.
हाती मिळालेल्या माहितीनुसार ,चिंतामणी मंगल कार्यालयाच्या समोर असणाऱ्या नंदनवन कॉलनी मध्ये आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास खुल्या नाल्यामध्ये अज्ञात व्यक्तीचा संशयास्पद रित्या मृतदेह आढळला. परिसरातील नागरिकांना हि बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने सांगली शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. सांगली शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह सापडल्याची माहिती परिसरात काळातच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान मृतदेहाची अद्याप पर्यंत ओळख पटलेली नाही.
दरम्यान शहर पोलिसांनी मृतदेह पुढील उत्तर तपासणी साठी वसंतदादा शासकीय रुग्णालयात पाठवलेला आहे. उत्तर तपासणीचा अहवाल आल्यानंतरच त्या व्यक्तीचा मृत्यू नेमका कशाने झाला आहे हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान खुल्या नाल्यामध्ये अज्ञात व्यक्तीचा संशयित रित्या मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती.