सलग 50 वर्षे बिनविरोध : कराड तालुका खरेदी- विक्री संघ उंडाळकर काकांचाच

Karad Taluka Kharedi Vikri Sangh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुका खरेदी विक्री संघाच्या 2022-23 ते 2027-28 पंचवार्षिक निवडणुकीत 17 जागांसाठी 17 उमेदवारी दाखल झाले होते. अर्ज छाननीमध्ये सर्वच्या सर्व 17 अर्ज वैध ठरल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी मंत्री स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली सलग 9 पंचवार्षिक व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, रयत कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक बिनविरोध झाली. सलग 10 पंचवार्षिक बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राहिली आहे. सलग 50 वर्षे खरेदी- विक्री संघ बिनविरोध करत स्व. विलासराव पाटील- उंडाळकर याचाच असल्याचे शिक्कामोर्तब झाले.

कराड तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी 27 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर अर्ज भरण्याची मुदत होती. गुरूवारी 3 नोव्हेंबरला अर्जची छाननी तर दि. 18 पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. दि. 21 नोव्हेंबरला निकाल असा निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. संघाच्या 17 जागांसाठी 17 उमेदवारी अर्ज दाखल होते.

बिनविरोध नवनिर्वाचित संचालक व कंसात गाव पुढीलप्रमाणे ः-  रंगराव महादेव थोरात (कार्वे), हणमंतराव विष्णू चव्हाण (साजूर), उत्तम विष्णू जगताप (वडगाव हवेली), बाजीराव नरसू पाटील (येळगांव), प्रताप पोपट कणसे (शेणोली), अनिल बाजीराव मोहिते (तळबीड), श्रीमंत तुकाराम काटकर (बेलदरे), कैलास वसंतराव साळवे (मुंढे), यशवंत रावसो डुबल (हजारमाची), जगन्नाथ ज्ञानदेव मोरे (कापील), मच्छिंद्र रामचंद्र बानुगडे (बानुगडेवाडी), जगन्नाथ शंकरराव थोरात (कोर्टी), रंजना संतोष पाटील (कोळे), शालन विष्णू जाधव (टाळगांव), दिलीप जिजाबा भिसे (सुर्ली), महेश ज्ञानदेव पाटणकर (कासारशिंरबे), किसन गंगाराम चव्हाण (नवीन कवठे) या सर्वचे अर्ज आज छाननीमध्ये वैध ठरले.

माजी मंत्री स्व. विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली संघाचे काम उत्कृष्ठ सुरु असल्यामुळे 1974 पासून सलग 9 पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध झाली होती. आता परंपरा कायम ठेवत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व रयत कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.