Unseaonal Rain | राज्यातील ‘या’ भागात कोसळणार अवकाळी पाऊस; हवामान खात्याचा इशारा

0
1
Unseaonal Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Unseaonal Rain |एप्रिल महिना सुरू झालेला आहे. आणि उन्हाचा तीव्र चटका गेल्या काही दिवसापासून जाणवत आहे. वातावरणातील उष्णता देखील वाढलेली आहे. गर्मीमुळे अगदी घरात बसणे देखील कठीण झालेले आहे. अशातच आता राज्यातील अनेक भागांमध्ये काही दिवसात अवकाळीच्या (Unseaonal Rain) पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेपासून नागरिकांना काहीसा आराम मिळणार आहे.

हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे गोव्यासह राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 5 एप्रिल ते 9 एप्रिल पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज देखील काही प्रमाणात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

या राज्यात होणार अवकाळी पाऊस

ईशान्य भारतासह पश्चिम हिमालयातील काही भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर काही भागात हिमवृष्टी देखील होणार आहे. भारतीय मध्य आणि दक्षिण दविपकल्पीय प्रदेशात देखील पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये देखील पाऊस पडू शकतो.

ईशान्यकडील या राज्यात होणार पाऊस | Unseaonal Rain

ईशान्येकडील आसाम आणि मेघालय या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अरुणाचल प्रदेशमध्ये देखील पाऊस होण्याची आणि हिमवृष्टीची शक्यता वर्तवली आहे.