unseasonal rain | नुकतीच उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. आणि शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम काढण्याची वेळ देखील आलेली आहे. परंतु आता पीक चांगलेअसताना शेतकऱ्यांपुढे एक मोठे संकट उभे राहिलेले आहे. ते म्हणजे आता अवकाळी पावसाचे संकेत दिलेले आहे. राज्यात काही दिवस येल्लो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होणार असल्याचे दिसत आहे.
रब्बी हंगामाची पिजे लावली होती ती पिके काढण्याची आता वेळ आलेली आहे. आणि अशातच गारपीट आणि पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे आज पासून 3 दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट साजरी करण्यात आलेला आहे.
विदर्भात पावसाची शक्यता | unseasonal rain
नागपूरच्या परिसरात आज वादळी पाऊस आणि गारपिटाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी केलेले आहे. त्यासोबतच वादळी वारे आणि गारपिटाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण वाढले आहे. कारण आता रब्बी हंगामातील पिके काढायला आलेली आहे. त्याचप्रमाणे विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे थंडीचा पारा सरासरी 2 ते 4 अंशाने घसरण्याची शक्यता देखील आहे.
कोणत्या जिल्ह्यात येल्लो अलर्ट
हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट देखील जारी केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 26 फेब्रुवारी रोजी नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली या मला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. नागपूरला अरेंज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.
त्याचप्रमाणे 27 फेब्रुवारी रोजी अमरावती, नागपूरz गोंदिया वर्धा, भंडारा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. त्याचप्रमाणे वाशिम, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, परभणी,नांदेड, चंद्रपूर,गडचिरोली या जिल्ह्यात येल्लो अलर्ट जारी केलेला आहे. त्याचप्रमाणे 28 फेब्रुवारी रोजी अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यातील आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आता शेतकरी खूप चिंतेत आलेले आहेत. कारण त्यांच्या हातात आलेले पीक जर वाया गेले तर त्यांना खूप मोठा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आता पाहायला मिळत आहे.