Unseasonal Rain In Maharashtra | महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे थैमान, आज ‘या’ ठिकाणी मेघगर्जनेस होणार पाऊस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Unseasonal Rain In Maharashtra | फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे. आणि अशातच महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या मेघगर्जनीसह मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. त्याचप्रमाणे वादळी वारा आणि गारपीटीचा देखील सामना नागरिकांना करावा लागत आहे. या अचानक आलेल्या पावसामुळे ( Unseasonal Rain In Maharashtra )शेतकऱ्यांच्या पिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आणि शेतकरी चांगला संकटात सापडलेला आहे. शेतकऱ्यांची शेतातील पिके काढायला आलेली आहे. परंतु या पावसामुळे आता त्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होणार असल्यास दिसत आहे.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार मंगळवारी आज म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी आणि 28 फेब्रुवारी रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासहविसह मुसळधार पाऊस पडणार आहे. (Unseasonal Rain In Maharashtra) त्याचप्रमाणे काही भागात गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधीच काळजी घेण्याची माहिती दिलेली आहे.

कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊस | Unseasonal Rain In Maharashtra

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर, जालना हिंगोली, नांदेड यांसारख्या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. 26 फेब्रुवारी रोजी देखील बहुतेक आणि पावसाने हजेरी लावलेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आणि कन्नड तालुक्यात गारपीट झालेली आहे. ( Unseasonal Rain In Maharashtra ) तसेच अकोला जिल्ह्यातील बाळापुर तेल्हारा आणि अकोट तालुक्यात जालनात, जाफराबाद तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान देखील झालेले आहे. परंतु येत्या काळात ज्या ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्याची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना त्यांचा शेतातील पीक गारपीटीपासून वाचवण्यासाठी फायदा होणार आहे