हरिद्वार : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये शुक्रवारी रात्री एक भीषण अपघात (accident) झाला. यामध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या एका डंपरने कावडधाऱ्यांना चिरडले आहे. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे कावडधारी हरिद्वारहून ग्वाल्हेरच्या दिशेने जात होते. यावेळी हा भीषण अपघात (accident) झाला.
UP | 5 dead after Kanwar devotees from MP's Gwalior were mowed down by a truck in Hathras district during early hours, today pic.twitter.com/8UZjFzZMJM
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) July 23, 2022
हाती आलेल्या माहितीनुसार, हाथरस येथे झालेल्या या अपघातात 5 भाविकांचा जागीच मृत्यू (accident) झाला तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. तसेच एक जण गंभीर जखमी असून मृत्यूशी झुंज देत आहे. कोतवाली सादाबाद बढार चौकामध्ये हा अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी (accident) दाखल झाले. यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले तसेच या प्रकरणाच्या अधिक तपासाला सुरूवात केली आहे.
या भीषण अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याच दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस जिल्ह्यात एका रस्ते अपघातात (accident) 6 कावडधाऱ्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना करतानाच मुख्यमंत्र्यांनी शोकाकूल कुटुंबीयांबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर