UPमधील आणखी एका आमदारावर बलात्काराचा आरोप; व्हिडिओ कॉल करून पीडितेला नग्न होण्यास लावायचा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ । मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. दरम्यान, राज्यातील अजून एका आमदारावर बलात्काराचा आरोप झाला असून, पीडित तरुणीने उत्तर प्रदेशमधील ज्ञानपूर येथील आमदार विजय मिश्रा याच्याविरोधात एका महिलेने बलात्काराती तक्रार दिली आहे. सदर आमदाराने धमकावून २०१४ पासून आतापर्यंत अनेकदा आपले शारीरिक शोषण केले, असा आरोप या तरुणीने केला आहे. पीडित तरुणीने भदोहीमधील गोपिगंज पोलीस ठाण्यात आमदार विजय मिश्रा याच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. विजय मिश्रासह अन्य दोघांविरोधातही तरुणीने तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी विजय मिश्रा, विष्णू मिश्रा आणि विकास मिश्राविरोधात तक्रार नोंदवली आहे.

२०१४ मध्ये झालेल्या एका कार्यक्रमावेळी गायिका असलेल्या या पीडित तरुणीने विजय मिश्रा याने पहिल्यांदा शोषण केले होते. दरम्यान, नवभारत टाइम्सशी संवाद साधताना पीडितेने सांगितले की, २०१४ मध्ये केलेल्या बलात्कारानंतर विजय मिश्रा सातत्याने तिचे शोषण करत आला आहे, तो व्हिडीओ कॉलवर न्यूड होण्यासाठी तगादा लावत असे. तसेच असे न केल्यास जिवे मागण्याची धमकी देत असे. व्हिडिओ कॉलवर विजय मिश्रा स्वत: नग्न होत असे तसेच आपल्यावरही नग्न होण्यासाठी जबरदस्ती करत असे, असा आरोपही या तरुणीने केला.

दरम्यान, आपल्यासोबतच इतर अनेक महिलांनाही या आमदाराने आपल्या वासनेची शिकार बनवल्याचा दावा या महिलेने केला आहे. मात्र या आमदाराच्या प्रतिष्ठेमुळे कुणी पुढे येऊन तक्रार करत नाहीत. मीसुद्धा घाबरून एवढे दिवस गप्प राहिले. मात्र सदर आमदार तुरुंगात गेल्याने आता मी हिमतीने त्याच्याविरोधात तक्रार देत आहे. सर्व तरुणींनी या व्यक्तीविरोधात आवाज उठवला पाहिजे. तसेच असे राक्षस आणि महिषासूरांचा नाश झाला पाहिजे, असेही ही तरुणी म्हणाली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”